एबीपी माझाची वेबसाईट आता नव्या रुपात, बातम्यांचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2019 07:36 AM (IST)
‘एबीपी माझा’ची वेबसाईट आता नव्या रुपात, नव्या फीचर्ससह तुमच्यासाठी बातम्या देण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : एबीपी माझा हे मराठीतील लोकप्रिय आणि सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं माध्यम आहे. एबीपी माझा नेहमीच बातम्यांचे सर्व ताजे अपडेट्स टीव्हीसह आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. ‘माझा’ची वेबसाईट आता नव्या रुपात, नव्या फीचर्ससह तुमच्यासाठी बातम्या देण्यासाठी सज्ज झाली आहे. माझाच्या वेबसाईटवर भारत, क्रीडा, टीव्ही-नाटक, विश्व, निवडणूक अशा विविध कॅटेगरींसोबतच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांच्या कॅटेगरीजही देण्यात आल्या आहेत. साईटवर वरच्या भागात लाईव्ह टीव्ही आणि व्हिडीओ पाहण्यासाठी सेक्शन करण्यात आले आहेत. तर उजव्या बाजूला वाचकांना ट्रेण्डिंग बातम्या दिसणार आहेत. वेबसाईटवर खाली स्क्रोल केल्यावर व्हिडीओ, महाराष्ट्र आणि महत्त्वाच्या शहरांमधील बातम्या, भारत, क्रीडा, सिनेमा सोबतच फोटो गॅलरीही पाहता येणार आहे. त्याखालीच टीव्ही-नाटक, विश्व, टेक आणि पोलचा ऑप्शन देण्यात आला आहे. लाईफस्टाईल, शेती, निवडणूक सेक्शनसोबतच त्याच्याशेजारी ब्लॉगचा पर्याय देण्यात आला आहे. एबीपी माझावरील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे एपिसोड्स, व्हिडीओ त्या-त्या कार्यक्रमांच्या सेक्शनखाली पाहता येणार आहेत. सोबतच मूव्ही रिव्ह्यूचा पर्यायही सुटसुटीतपणे देण्यात आला आहे.