मुंबई : 'एबीपी माझा'तर्फे दरवर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित करण्यात येते. 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' या कार्यक्रमात 'ब्लॉग माझा 2018' स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पंकज समेळ यांच्या 'महाराष्ट्र देशा' ब्लॉगची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे.


प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो ब्लॉगर्समधून टॉप ब्लॉग निवडणं, हे परीक्षकांसमोरील मोठं आव्हान होतं. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर आणि 'अक्षरनामा'चे संपादक राम जगताप यांनी काम पाहिलं.

फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेक जण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा आयोजित करण्यात येते.

एबीपी माझा आयोजित #ब्लॉगमाझा 2018 स्पर्धेचा निकाल :

प्रथम पारितोषिक

पंकज समेळ - ब्लॉग 'महाराष्ट्र देशा'

ब्लॉग लिंक : https://pankajsamel.wordpress.com/

द्वितीय पारितोषिक

राजेंद्र झगडे - ब्लॉग 'अनुभव....क्षण वेचलेले'

ब्लॉग लिंक : https://manaswirajan.wordpress.com/

तृतीय पारितोषिक

मुग्धा शेवाळकर आणि सचिन मणेरीकर - ब्लॉग 'शब्द तुझे मी माझे'

ब्लॉग लिंक :  www.mugdhasachin.wordpress.com

उत्तेजनार्थ प्रथम

नितीन साळुंखे - ब्लॉग 'नितीन साळुंखे'

ब्लॉग लिंक : https://nitinsalunkheblog.wordpress.com/

उत्तेजनार्थ द्वितीय

विजेत्या आहेत पूजा ढेरिंगे - ब्लॉग 'सूफी'

ब्लॉग लिंक : http://cozyywords.blogspot.com/

उत्तेजनार्थ तृतीय

अनुराधा कुलकर्णी - ब्लॉग 'मी अनु'

ब्लॉग लिंक : http://anukulkarni.blogspot.com/

उत्तेजनार्थ चतुर्थ

दुष्यंत पाटील - ब्लॉग 'मुशाफिरी कलाविश्वातली'

ब्लॉग लिंक : https://dushyantwrites.blogspot.com/

उत्तेजनार्थ पाचवा

अमोल कुलकर्णी - ब्लॉग 'विज्ञानयात्री'

ब्लॉग लिंक : https://koolamol.wordpress.com/