मुंबई : 'एबीपी माझा'चं अँड्रॉईड अॅप आता नव्या स्वरुपात तुमच्या भेटीला येत आहे. गुगल प्ले स्टोअर वरुन अॅप डाऊनलोड केल्यास किंवा अॅप अपडेट केल्यास 'एबीपी लाईव्ह'चं नव्या रुपातील अॅप तुम्हाला पाहता येईल आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
एबीपी लाईव्ह या एकाच अॅपमध्ये तुम्हाला मराठी (एबीपी माझा) सोबतच हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी आणि गुजराती अशा एकूण सहा भाषेत बातम्या वाचता येतील. त्यापैकी एबीपी माझा सिलेक्ट केल्यानंतर होमपेज सुरु होईल.
होमपेजवर तुम्ही त्या क्षणाची महत्त्वाची बातमी पहिल्या क्रमांकावर पाहू शकाल. त्यावर क्लिक केल्यानंतर सविस्तर बातमी आणि फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे संबंधित बातम्यांवर एका क्लिकसरशी जाण्याची सोयही उपलब्ध आहे. होमपेजवर दिवसभरातील ठळक घडामोडी पाहता येतील.



होमपेजवर उजव्या बाजूला असलेल्या सेक्शनवर क्लिक केल्यास फोटो गॅलरी, व्हिडिओसोबत मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्र, भारत, विश्व, टेक, क्रीडा, सिनेमा, टीव्ही-नाटक, लाईफस्टाईल, शेती असे पर्याय पाहता येतील. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या-त्या विभागातील बातम्या पाहण्याची सुविधा आहे.
'एबीपी माझा'वरील लोकप्रिय कार्यक्रम 'घे भरारी', 'चवदार चविष्ट', 'माझा कट्टा', जत्रा, 'सर्वव्यापी आंबेडकर', 'दुष्काळाशी दोन हात' यांच्याशी निगडीत बातम्या आणि व्हिडिओ पाहण्याचीही सोय आहे.


होमपेजवर वरच्या बाजूला लाईव्ह टीव्ही ही पट्टी तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यास टीव्हीप्रमाणेच तुमच्या मोबाईलवर तुम्ही 'एबीपी माझा' चॅनलवरील बातम्या लाईव्ह पाहू शकाल. होमपेजवरच फोटो गॅलरी, ब्लॉग, ओपिनियन पोल पाहण्याचीही सुविधा आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे नोटिफिकेशनही तुम्हाला वेळोवेळी येत राहतील. त्यावर क्लिक केल्यास थेट तुम्हाला बातमी वाचता येईल. त्याचप्रमाणे एखादी महत्त्वाची बातमी, पत्रकार परिषद लाईव्हही पाहता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en या लिंकवर गेल्यास प्ले स्टोअरवरुन एबीपी माझाचं अॅप तुम्हाला अपडेटेड स्वरुपात मिळेल.