या फेअरदरम्यानच 'फॅटी' नामक रोबोने अचानक ग्लास बुथ तोडलं आणि तिथे उपस्थित एका प्रेक्षकावर हल्ला करुन जखमी केलं. त्यानंतर फॅटीला फेअरमधून हटवण्यात आले.
16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान टेक फेअर सुरु असून, यामध्ये 37 देशांमधील लोकांचा समावेश आहे.
टेक फेअरच्या आयोजकांच्या मते, रोबोला ऑपरेट करणाऱ्याची चूक असून, त्याने रोबोला रिव्हर्स घेण्याऐवजी फॉरवर्डचं बटन दाबलं. यादरम्यान रोबोची दिशा बदलला आणि जिथे काचेची भिंत होती, तिथे रोबो आदळला.
फॅटी या रोबोची किंमत 1.28 लाख रुपयांहून अधिक आहे. रोबोच्या हल्ल्याची ही घटना आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.