मुंबई : ह्युंदाईनं एक्सेंट प्राइम सीएनजी कार नुकतीच लाँच केली आहे. एक्सेंट टी आणि एक्सेंट टी प्लस हे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. याची किंमत अनुक्रमे 5.93 लाख आणि 6.13 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
ही देशातील पहिली कमर्शियल सेडान कार्ड आहे. ज्यामध्ये सीएनजी कीट देण्यात आली आहे. या कारची स्पर्धा मारुती डिझायरशी असणार आहे.
या कारमध्ये कंपनीनं स्पीड लिमिटेड फंक्शन (एसएलएफ) देखील दिलं आहे. हे फीचर सुरु केल्यानंतर कारचा स्पीड 80 किमी प्रति तासाच्या वर जात नाही. या फीचरसाठी कंपनीनं कोणताही अतिरिक्त चार्ज लावलेला नाही. याच वर्षी लाँच झालेल्या नव्या डिझायरमध्ये देखील स्पीड लिमिटिंग फंक्शन देण्यात आलं आहे.
एक्सेंट प्राइम सीएनजीवर कंपनीनं 1,00,000 किमी किंवा 3 वर्षाची गॅरंटी दिली आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com