मुंबई : एचएमडी ग्लोबलने आपला नवा नोकिया 8.1 हा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन नोकिया 7 प्लसचं पुढील व्हर्जन असल्याचं कळतं.
6 GB रॅम आणि 128 GB स्टोअरेज असलेल्या या फोनची भारतीय बाजारातील किंमत 29, 999 रुपये आहे. तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोअरेजच्या फोनची किंमत 26,999 रुपये आहे. एवढ्या किंमतीतील या स्मार्टफोनमुळे ओप्पो R15 प्रो आणि आसूस झेनफोन 5Z ला टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारी 2019 पासून भारतीय बाजारात उपलब्ध होईल. तर अमेझॉन इंडिया, nokia.com/phones आणि देशातील विविध दुकानांमध्ये ग्राहकांना फोन खरेदी करता येणार आहे. Nokia.com वर हा फोन प्री-बुकही करता येऊ शकतो.
हा स्मार्टफोन ब्लू/सिल्वर या आयर्न/स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय भारतामध्ये मोबाईलचा खप वाढवण्यासाठी कंपनी विविध ऑफर्सही देणार आहे. एअरटेल युझर्ससाठी यामध्ये खास ऑफर आहेत. सोबतच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने ईएमआय देताना ग्राहकांना दहा टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
यामध्ये पाच टक्के कॅशबॅक 6 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत मिळेल, तर उर्वरित पाच टक्के कॅशबॅक 18 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे. तर जे ग्राहर ऑनलाईन स्मार्टफोन विकत घेताना, त्यांना तीन हजार रुपयांच्या किंमतीचं गिफ्ट कार्ड मिळेल.
नोकिया 8.1 ची वैशिष्ट्ये
डिस्प्ले : 6.18 इंच फूल HD+ डिस्प्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ची सुविधा
अँड्रॉईड : लेटेस्ट अँड्रॉईड 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टम
प्रोसेसर : ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710
रॅम : 6 GB
स्टोअरेज : 128 GB, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 400 GB पर्यंत वाढवता येणार
सिम : हायब्रीड ड्यूएल सिम सपोर्ट
कॅमेरा : ड्यूएल रिअर कॅमेरा सेटअप, 12 मेगापिक्सेल सेन्सर
रिअर कॅमेऱ्यात AI फीचर
बॅटरी : 3500mAh बॅटरी
आवश्यक कनेक्टिव्हिटी ऑप्शन
फिंगरप्रिंट सेन्सर
6GB रॅम, 128GB स्टोअरेज, नोकिया 8.1 लॉन्च; किंमत....
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 10:36 AM (IST)
हा स्मार्टफोन ब्लू/सिल्वर या आयर्न/स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय भारतामध्ये मोबाईलचा खप वाढवण्यासाठी कंपनी विविध ऑफर्सही देणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -