मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ आल्यापासून इंटरनेट डेटाबाबत प्राइसवॉर सुरु झालं आहे. त्यामुळे आता एअरटेलनं पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे.
हा प्लॅन कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. यामध्ये ग्राहकांना 6 महिन्यांसाठी तब्बल 60 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. म्हणजेच दर महिन्याला 10 जीबी याप्रमाणे 6 महिन्याला 60 जीबी डेटा मिळणार आहे.
कशी मिळवाल ही खास ऑफर?
ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सला फक्त 'My Airtel App'डाऊनलोड करावं लागेल. अॅप डाऊनलोड केल्यावर एक पेज सुरु होईल. ज्यामध्ये फ्री डेटा प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. फक्त तीन सोपे टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला तात्काळ ही ऑफर मिळेल.
दरम्यान, एअरटेलनं याआधी मान्सून डेटा प्लॅन आणला होता. ज्यामध्ये ग्राहकांना तीन महिन्यासाठी 30 जीबी डेटा फ्री देण्यात आला होता. आता कंपनीनं 60 जीबी मोफत डेटा प्लॅन आणून जिओला मोठी टक्कर दिली आहे.
(नोट : संबंधित ऑफर तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा.)