मुंबई : रिलायन्स जिओला टेरिफ प्लॅनमध्ये टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी आयडिया देखील सज्ज झाली आहे. यासाठी आयडियानं एक नवा प्लॅन लाँच केला आहे. आयडियानं हा प्लॅन आपल्या प्री-पेड यूजर्ससाठी आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला 84 दिवसांसाठी 126 जीबी डेटा मिळणार आहे.


आयडिया सेल्यूलरच्या वेबसाइटवर या प्लॅनची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, या प्लॅनची किंमत 697 रुपये आहे.  ज्यामध्ये 84 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा यूजर्सला मिळणार आहे. यासोबतच लोकल-एसटीडी अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे.

एअरटेल आणि जिओनं देखील 84 दिवसांसाठीचे प्लॅन याआधीच लाँच केले आहेत. ज्यामध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा मिळतो. पण त्या प्लॅनची किंमत 399 रुपये आहे.

जिओनं 399 शिवाय 349 रुपयांचा आणखी प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला 56 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 20 जीबी डेटा मिळत आहे.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)