नवी दिल्लीः ग्राहकांना मजबूत कनेक्टीव्हिटी मिळावी यासाठी व्होडाफोन आणि सरकारी कंपनी बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आणि व्होडाफोन यांनी राष्ट्रीय स्तरावरील 2G इंटर सर्कल करार केला आहे.
काय आहे 2G इंटर सर्कल करार?
बीएसएनएल आणि व्होडाफोनच्या या करारामुळे कॉल ड्रॉपच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठीही मदत होणार आहे. तसंच दोन्ही कंपन्यांचा नेटवर्क क्षेत्र वाढून ग्राहकांना फायदा होणार आहे.
गोव्यात पुढच्या महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनात दोन्ही कंपन्या अखंड कनेक्टीव्हिटी उपलब्ध करणार आहेत. बीएसएनएलचे ग्रामीण भागात जास्त ग्राहक आहेत. मात्र या करारामुळे शहरातील ग्राहक वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.