मुंबई: जगप्रसिद्ध टू व्हिलर कंपनी हिरो मोटर्सने नववर्षानिमित्त तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. Super Splendor, Passion PRO आणि Passion XPRO अर्थात सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो पुन्हा नव्याने, नव्या फीचर्ससह लाँच केल्या आहेत.

कंपनीने आपल्या हिरो पॅशन एक्स प्रोचं उत्पादन थांबवलं होतं, मात्र आता नव्या बदलासह या बाईक्स भेटीला येत आहेत.

सुपर स्प्लेंडर आणि पॅशन प्रो या आजही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र नव्या गाड्यांमध्ये नवे बदल करुन, त्या पुन्हा बाजारात आणल्या जाणार आहेत.

या तीनही मोटरसायकल कंपनीचं पेटंट असलेल्या इंधन बचतीचं i3s तंत्रज्ञानयुक्त आहेत. त्यामुळे पेट्रोल बचत होऊन, जास्त मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.



नव्या बाईक्सची वैशिष्ट्ये

हिरोने नव्या बाईक्स नव्या रंगात, नव्या ढंगात आणल्या आहेत. स्टाईल, इंजिन क्षमता आणि मायलेज हे या बाईक्सचं वैशिष्ट्य आहे.

तीनही बाईक वेगवेगळ्या पाच रंगात उपलब्ध आहेत.

किंमत किती?

कंपनीने आज या बाईक्स लाँच केल्या असल्या, तरी येत्या वर्षात म्हणजेच पुढील महिन्यात त्याच्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत.

सध्याच्या किमतीपेक्षा या बाईक्सच्या किमती 700 ते 2 हजार रुपये महाग असण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्यापर्यंत या गाड्या डिलर्सकडे पोहोचतील.

Hero Super Splendor ची वैशिष्ट्ये

  • इंजिन 124.7 CC

  • 11.4 बीएचपी क्षमता

  • 4 गियर


Passion XPro ची वैशिष्ट्ये

  • इंजिन 110 CC

  • इंजिन क्षमता 9.4 बीएचपी

  • लांबी -2005 mm,

  • रुंदी -765 MM

  • उंची - 1115mm


Passion Pro ची वैशिष्ट्ये

  • इंजिन 97.2 CC