नवी दिल्ली : फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. या पाच कोटी अकाऊंट्समध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या अकाऊंटचाही समावेश आहे. पाच कोटी फेसबुक अकाऊंट्सला काल हॅक करण्यात आलं होतं. या हॅकिंगच्या घटनेमुळे फेसबुक पुन्हा एकदा वादात अडकताना दिसत आहे.


फेसबुक पाच कोटी युजर्सचा डेटा चोरी होण्याची घटना शनिवारी समोर आली. मात्र त्यानंतर फेसबुकने स्पष्ट केलं की सिक्युरिटीच्या अभावामुळे काही हॅकर्सनी फेसबुक युजर्सचे अकाऊंट हॅक केले होते. फेसबुकने हा सिक्युरिटी ब्रीचचा पूर्णत: दूर केलं आहे.


फेसबुकने आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं की, फेसबुकचं फीचर 'व्हू अॅज'ला युजर्सच्या अकाऊंटला हॅक करण्यासाठी वापरलं गेलं. त्यानंतर फेसबुकने या सर्व युजर्सचे अकाऊंट लॉग आऊट केले. युजर्सचे अकाऊंट हॅक होण्यापासून वाचावे हा फेसबुकचा यामागचा हेतू होता.


फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसला आहे. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे अकाऊंट आपल्या ताब्यात घेतल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं.


हॅकर्सनी अॅक्सेस टोकंस चोरल्याने हे अकाऊंट्स हॅक झाले होते. अॅक्सेल टोकंस एक प्रकारच्या डिजिटल चाव्या असतात. तसेच हॅकर्स फेसबुचा कोड भेदण्यात यशस्वी झाल्याचं फेसबुकच्या प्रोडक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष गे रोसेन यांनी स्पष्ट केलं.


संबंधित बातम्या


तुमचं फेसबुक अकाऊंट आपोआप लॉग आऊट झालंय का?