मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त True Caller या मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीतर्फे एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आलं आहे. मोबाईल क्रमांकाची ऑनलाईन डिरेक्टरी असं स्वरुप असलेल्या True Caller या अॅपचा स्मार्ट फोन युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याकडून 'Understanding Impact of Harassment, Spam Calls & SMS for women' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असलेल्या महिलांपैकी 52 टक्के महिलांना आठवड्यातून एकदा तरी हा त्रास सहन करावा लागतो. यापैकी 74 टक्के कॉल्स अनोळखी व्यक्तीचे असल्याचं समोर आलं आहे.
भारताची राजधानी दिल्लीतील 28 टक्के महिलांना दर आठवड्याला त्रासदायक कॉल्स आणि मेसेजचा त्रास होतो असं या अहवालात म्हटलं आहे. तर 53 टक्के महिलांना वैयक्तिक माहिती विचारणा करणारे कॉल्स येत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
अशा प्रकारे त्रासदायक कॉल्स येणाऱ्या महिलांपैकी 74 टक्के महिला अशा क्रमांकांना ब्लॉक करतात, डीएनडी सेवा अॅक्टिवेट करतात, सोशल मीडियावर याबाबत माहिती पोस्ट करतात किंवा रितसर तक्रार देतात असं देखील या अहवालात म्हटलं आहे.
भारतातील 14 प्रमुख शहरांमध्ये 15 ते 35 या वयोगटातील महिलांचं True Caller तर्फे सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला. 'इप्सॉस' या संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 9 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 2150 महिलांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिन विशेष : भारतातील दर तीन पैकी एका महिलेला अश्लील मेसेज, अनोळखी कॉल्सचा त्रास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2019 05:30 PM (IST)
जागतिक महिला दिनानिमित्त True Caller या मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीतर्फे एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आलं आहे.
Photo : Getty Images
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -