Suresh Dhas बीड : महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या हत्या प्रकरणासह परळीतील बापू आंधळे खून प्रकरणाचा देखील तपास झाला पाहिजे. अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. तर परळीमध्ये एक लाख 40 हजार मताने तुम्ही कसे निवडून आलात? हे लोकांना माहितीय, असं म्हणत सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली. तसेच वाल्मिक कराडचा (Walmik Karad) मुलगा सुशील कराड याचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलं.

Continues below advertisement


बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही-सुरेश धस


बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती. दरम्यान बीडमधील पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी ठेवीदारांना मिळाव्यात. अशी मागणी अजित दादांकडे करण्यात आली. त्याबरोबरच गोट्या गित्ते सारखा आरोपी अटक झाला पाहिजे. तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्याप कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्याप कोणाचीही चौकशी झाली नसल्याचं धस यांनी म्हटल आहे.


अनेक मल्टीस्टेटमध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत. याच्यावर लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. एसपी प्रामाणिक आहेत, मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत. एसपींनी मकोका लावण्याचा काम जोरात केलं, पण मकोका मधील आरोपी आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहेत. गोट्या गित्तेसारखा आरोपीला अटक व्हायला पाहिजे, आरोपी नंदा गावच्या पुढे रेल्वेट्रॅक वर वक्तव्य करत असेल, बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही. अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिलीय.


एसपी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये


महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटवा मीटविचे काम केले आहे, त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगतील. बापू आंधळेला महादेव गित्तेनी समोरून गोळी मारले, असे म्हणतात. मग त्याला समोरून गोळी लागली पाहिजे. मात्र बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागली, त्याचा तपास झाला पाहिजे. महादेव मुंडेच्या बरोबरच बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे, याच्यात जे लोक नाहीत त्यांची पण नाव घेण्यात आली आहेत. एसपी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये, एसपी साहेबांकडे तक्रार केल्यास ती लवकरात लवकर सोडवली जाते.


भीतीच वातावरण कमी झाले मात्र क्राइम रेट कमी झालेला नाही-सुरेश धस


जिल्ह्यातले भीतीच वातावरण कमी झाले मात्र क्राइम रेट पाहिजे तेवढा कमी झालेला नाही. पंकज कुमावत हे केजमध्ये असताना आईची साहेबांनी त्यांना सूट दिली होती. त्यांनी अनेक मोठ्या कारवाया त्यावेळेला केलेले आहेत. कुमावत यांच्या कामाची पद्धत फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे. त्यातलाच एक भाग म्हणून कुणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्यापुढे येता मला माहिती द्या, असे त्यांनी आवाहन केले आहे त्यात काही वावगे नाही, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.


संबंधित बातमी:


मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!