अहमदनगर : आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलानं (Suresh Dhas Son) सोमवारी कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली, यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आमदार धस यांचा मुलगा सागर धस बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
Who Is Sagar Dhas : कोण आहे सागर धस?
सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर धस याने वडिलांसाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि प्रचाराची धुरा सांभाळली.
सागर धसचे शिक्षण पुण्यात झालं आहे. सागर हा आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रमात सागर धस याचा सक्रिय सहभागा पाहायला मिळतो.
ही बातमी वाचा: