Horoscope Today 7 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 7 ऑगस्ट 2025, आजचा वार गुरूवार आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या कला कलाने घ्यावे लागेल, नोकरी व्यवसायात बौद्धिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज हुशारीच्या जोरावर अनेक कामे पार पाडाल, तुमच्या कामातील एकाग्रता इतरांच्या नजरेत भरणारा ठरेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज थोड्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावामुळे जवळच्या माणसांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज थोडा हट्टीपणा वाढेल, नेहमीच्या नियोजित कामांमध्ये फार मोठा फरक करून इतरांचे डोळे दीपावून टाकाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी चालून येतील, प्रकृतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज अपचन पायदुखी यासारख्या आजार संभवतात. शिस्त आणि ताकतिक या गोष्टींचे चाहते रहाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या कामांमध्ये घरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल, काही वेळा धाडसी निर्णयही घ्यावे लागतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील, आवकही वाढेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो खर्च वाढल्यामुळे हातात पैसा मात्र राहणार नाही, चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल, वरिष्ठांची मर्जी संपादन होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज घरातील व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी एखादा वेगळा बेत आखाल. तरुणांचे विवाह ठरतील.
हेही वाचा :
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये? देवी लक्ष्मीशी संबंधित पौराणिक कथा, शास्त्रांत सांगितलेलं कारण जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)