Supriya Sule Jitendra Awhad Visit Massajog Village: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज (18 फेब्रुवारी) मस्साजोगमध्ये जाणार आहेत. यासोबतच महादेव मुंडे यांचा खून 14 ते 15 महिन्यापूर्वी झाला होता. मात्र आता पुन्हा त्या खूणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मस्साजोगनंतर सुप्रिया सुळे या परळीमध्ये महादेव मुंडे कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत.
सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) देखील मस्साजोग दौऱ्यावर जाणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुरवातीपासूनच संतोष देशमुख खात्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष भेटीनंतर जितेंद्र आव्हाड नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
तुम्ही मला पोरक करू नका- धनंजय देशमुख
तपास यंत्रणांवर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा आरोपीला खून झालेला आहे. सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. हत्या झाल्यापासून आठ दिवसात काय काय प्रकार घडले याची सविस्तर माहिती मागवणार आहोत. गावातील दहा व्यक्तींची कमिटी तयार करून या तपासावर लक्ष ठेवू..आपल्यामध्ये समन्वय राहील असं करू, असं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले. आपला माणूस गेला आहे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे..सुप्रिया सुळे यांना भेटीदरम्यान कोणत्या मागण्या द्यायच्या या संदर्भातील निवेदन तयार करू..आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी न्याय मिळावा ही भावना आहे, त्याची जाणीव आहे. तुम्ही मला पोरक करू नका, असं धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना आवाहन केलं. आपण सर्व गरीब माणसे आहोत..तुम्ही असा कधी संकोच बाळगू नका मला बोलण्यासंदर्भात, असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार-
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार आहे. संपत्ती तर जप्त करावीच, मात्र त्याला अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. यापूर्वीच कृष्णा आंधळेला फरार घोषित केल्यानंतरच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती आणि ती न्यायालयाकडून मिळाल्यानंतर आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
संबंधित बातमी:
संतोष देशमुखांच्या हत्येला 68 दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेला अटक करा, मस्साजोगमधील ग्रामस्थांची मागणी