Health Tips : उन्हाळ्याचे दिवस असो वा हिवाळ्याचे, सनस्क्रिन लोशनचा वापर हा प्रत्येक ऋतूमध्ये केला जातो. ते आपल्या त्वचेला हवे असणारे पोषण द्यायला मदत करते.  सूर्यापासून निघणाऱ्या तीव्र किरणांमुळे आपल्या शरीरावर तसेच चेहऱ्यावर टॅनिंग होऊ शकते. त्यामळे बहुतेकजण सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देतात. घरातून बाहेर पडताना त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सनस्क्रिन लोशन रोज वापरले तर तीव्र उन्हापासून आणि धुळीपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. मात्र कोणती सनस्क्रिन तुमच्या चेहऱ्याला सूट होऊ शकते , ती किती प्रमाणात लावली पाहिजे, दिवसातून किती वेळा सनस्क्रिन चेहऱ्यावर लावणे योग्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.


घरात असतानाही सनस्क्रिन वापरावे का?


होय. अमेरिकन असोसिएशन आॅफ डर्मेटोलाॅजीच्या सांगण्यावरून घरातील खिडकीतून देखील सूर्याची किरणे येतात. त्यामुळे घरात असतानाही सनस्क्रिनचा वापर करावा. तसेच तुम्ही कारने प्रवास करत असाल तरीही थोड्या प्रमाणात सनस्क्रिनचा वापर करा. 


SPF म्हणजे काय? रोज वापरल्या जाणाऱ्या सनस्क्रिनमध्ये किती प्रमाणात SPF हवे?


SPF म्हणजे Stands For Sun Protection. याचे रेटिंग सूचित करते की , एखादे सनस्क्रिन सुर्यप्रकाशापासून त्वचेचे किती चांगले संरक्षण करते. UV किरणांचे दोन प्रकार आहेत. UVA आणि  UVB. जेव्हा आपण SPF रेटींगचा विचार करतो तेव्हा आपण केवळ UVB किरणांचा विचार करतो. SPF 15 असलेले सनस्क्रिन 93 % UVB किरणांना ब्लाॅक करते. तर SPF 30 हे 97 % किरणांना तुमच्यापर्यंत येण्यापासून रोकते. SPF 30  सूर्यप्रकाशापासून तुमचे जास्त संरक्षण करू शकत नाही. SPF 50 हे  98 % किरणांपासून तुमचे संरक्षण करते आणि SPF 100 99 %  UVB किरणांना तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून संरक्षण करते. 


किती प्रमाणात सनस्क्रिन चेहऱ्याला लावायाला हवी?


एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, एक चमचा इतकी सनस्क्रिन चेहऱ्याला लावायाला हवी. ही सनस्क्रिन चेहऱ्यावर लावताना मान, कानाच्या मागच्या भागाला देखील सनस्क्रिन लावावे. घरातून बाहेर पडण्याआधी साधारण 15 ते 20 मिनीट आधी सनस्क्रिन चेहऱ्याला लावली पाहीजे. उन्हात जास्त वेळ काम करत असाल तर दर दोन तासाने सनस्क्रिन लावावी. केवळ चेहऱ्याला सनस्क्रिन न लावता शरीराच्या इतर उघड्या भागांनाही सनस्क्रिन लावावी. 


माॅइश्चरायझर लावण्यापूर्वी किंवा नंतर सनस्क्रिन लावलया हवी का ?


हे तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रिनच्या प्रकारावन अवलंबून आहे. जर तुम्ही केमिकल  सनस्क्रिनचा वापर करत असाल तर त्या आधी तुम्ही माॅइश्चरायझर लावायला हवे. मात्र जर मॅट सनस्क्रिन लावत असाल तर माॅइश्चरायझर लावण्याची गरज नाही. 


लहान मुलांना  सनस्क्रिन लावायला हवी का ? लहान मुलांसाठी वेगळी  सनस्क्रिन असते का ?


सहा महिन्याच्या मुलांना तुम्ही सनस्क्रिन लावू शकता. अशा काही  सनस्क्रिन बाजारात उपलब्ध आहेत, ज्या केवळ लहान मुलांसाठीच वापरल्या जातात. मात्र मोठ्या लोकांच्या सनस्क्रिन ही लहान मुलांना लावू शकतात पण त्याचा SPF 30 असायला हवा. 


महत्वाच्या इतर बातम्या 


NAMO Shetkari Yojana: पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये, एका रुपयात पीक विमा