Success Story : सध्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी तासनतास अभ्यास करत असतात. शिवाय सरकारी नोकरी म्हणजे समाजात प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे अनेकांचा स्पर्धा परिक्षा पास (Competitive Exams) करुन चांगली नौकरी मिळवण्याकडे कल असतो. बिहारमधील एका तरुणीने एक-दोन नाही तर तब्बल 5 सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा पास केली. टीनू सिंह असे या तरुणीचे नाव आहे.  


आईचं स्वप्न सत्यात उतरवलं


टीनू सिंह (Tinu Singh) हिच्या आईचे अधिकारी (officerबनण्याचे स्वप्न होते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक परिस्थिती यामुळे टीनूची आई पिंकी सिंह यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. पिंकी सिंह (Pinki Singh) यांनी देखील इंग्रजी (English) विषयात एम.ए पूर्ण केले होते. याशिवाय त्यांनी बीएडची (B.ed) पदवीही प्राप्त केली होती. पुढे आणखी अभ्यास करुन त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना अधिकारी बनता आले नाही. त्यामुळे त्या गृहिणीच राहिल्या. मात्र, आईचे स्वप्न मुलीने पूर्ण केले आहे. 


टीनूने परिक्षा पास होण्याची माळचं लावली 


टीनू सिंह (Tinu Singh) एकापाठोपाठ एक अशा 5 परिक्षेत यश मिळवले. तिच्या या कामगिरीचा कुटुंबियांनाही अभिमान वाटलाय. तिचे निकटवर्तीय आणि शेजारच्या लोक तिच्या या यशामुळे फार आनंदी झाली आहे. एवढे यश मिळवूनही तिने अद्याप तिचे स्वप्न पूर्ण झाले नसल्याचे म्हटले आहे. तिला आणखी अभ्यास करुन सनदी अधिकारी बनायचे आहे. 


कोण कोणत्या परिक्षा पास केल्या?


टीनू सिंह (Tinu Singh) हिने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 5 परिक्षांमध्ये यश मिळवलं. 22 डिसेंबरला तिची कंप्यूटर ऑपरेटरपदी निवड झाली होती. त्यानंतर त्याच्या पुढील दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला बिहारच्या एसएससी सीजीएल परिक्षेत तिला यश मिळाले. त्यानंतर सहाय्यक शाखा पदाधिकारी या पदासाठीही तिची निवड झाली होती.


BPSC परिक्षा पास करुन केला नवा विक्रम


 वरिल 3 परिक्षांशिवाय बीपीएसच्या शिक्षक भरती परिक्षेतही टीनूला 6-8 च्या कॅडरमध्ये यश मिळाले. याशिवाय बीपीएससी च्या शिक्षक भरतीमध्ये तिला 9 वी ते 10 आणि उच्च माध्यमिकच्या 11 ते 12 व्या कॅडरमध्येही यश मिळाले. टीनू तिच्या यशाचे श्रेय आपल्या आई -वडिलांना देते. 


अभ्यासासाठी सोशल मीडियापासून राहिली दूर 


आजचे तरुण सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असतात. दिवसातील अनेक तास ते सोशल मीडियावर घालवतात. मात्र, टीनू या सोशल मीडियापासून दूर राहिली. कोणत्याच सोशल मीडियावरती तिचे अकाऊंट देखील नाही. मी पुस्तकांशीच मैत्री केली. पुस्तकचं आपले चांगले मित्र असतात. शिवाय मी सातत्याने अभ्यास केला त्यामुळेच मला यश मिळाले, असे टीनूने तिच्या प्लॅनबद्दल सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Boycott Maldives Hashtag : पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये; यामागचं नेमकं कारण काय?