बीड : निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभावाचा आवमेळ यामुळे शेती आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे शेतीकरी पूरक व्यवसायाला पसंती देतात. याच पूरक व्यवसायातून अत्याधुनिक पोल्ट्री फार्म उभारणारे उच्चशिक्षित शेख बंधू आज यातील आयकॉन बनले आहेत.

 

शेख वसिम, शेख रौफ, शेख अब्दुल या तीन बंधुंनी बीड जिल्ह्यातील छोट्याशा नेकनूर गावात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन पोल्ट्री फार्म बनवला. या फार्ममध्ये 25 हजार पक्षी आहेत. पोल्ट्रीच्या ऑटोमायझेशनमुळे अवघ्या तीन मिनिटात 25 हजार पक्षांना खाद्य दिलं जातं आहे.

 

10 हजार पक्ष्यांपासून सुरु केलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये आज 25 हजार पक्षी आहेत. मात्र ऑटोमायझेशन पद्धतीमुळे पक्षांची निगा राखणं सोप्पं झालं आहे. चिक्स पक्षांना ठेवण्यासाठी अद्ययावत कम्पार्टमेन्ट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्ष्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि वाढ चांगली होते.

 

कसा आहे शेख बंधुंचा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म?

- 5 एकरावर 50 बाय 300 चे दोन शेड

- 25 हजार चिक्स पक्षांसाठी 50 बाय 250 चे एक शेड

- 75 हजार पक्षी बसतील एवढी क्षमता

- प्रत्येक पक्षासाठी 500 रुपये खर्च

- प्रत्येक पक्षी वर्षात 330 ते 340 अंडी देतो

- एका दिवसाला लेअर फार्ममधून 25 हजार अंडींचं उत्पादन

 

शेतीतून मिळणारं उत्पन्न कमी असल्याने शेख बंधुंना शेती पूरक व्यवसाय करण्याची संकल्पना सुचली. एक भाऊ व्हेटरनरी डॉक्टर असल्याने त्यांना या व्यवसायात जास्त अडचणी आल्या नाहीत. शेतीपूरक या व्यवसायातून शेख बंधुंना लाखोचं उत्पन मिळत आहे.

 

पाहा व्हिडीओ