शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य, अध्यादेशाला मंजुरी
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 09:48 AM (IST)
मुंबई: शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य होणार आहे. कारण फळं आणि भाजीपाला आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आला आहे. त्यासंदर्भातल्या अध्यादेशाला आज राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत बाजार समिती कायद्यानुसार शेतकऱ्यांना फळं आणि भाजीपाला बाजार समित्यांच्या आवारातच विक्री करावा लागत होता. मात्र व्यापाऱ्यांकडून अनेक शेतकरी नाडले जात होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.