नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशवादी हाफिज सईदचा जावई खालिद वालिदचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले, तर 21 जवान जखमी झाले आहेत.   या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठकही सुरु आहे.   मोठ्या हल्ल्याची तयारी? सध्या जम्मू काश्मिरमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू दुजाना दबा धरून बसला आहे. तो मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं गुप्तचर सूत्रांनी सांगितलं आहे.   दहशतवादी कृत्याचा कोडवर्ड सूत्रांच्या मते, पंपोर हल्ल्यादरम्यानच्या फोनकॉल ट्रेस केल्यानंतर हल्ल्याचा कोडवर्ड समोर आला आहे. अबू दुजाना हा पाकिस्तानात बसलेल्या लष्कर कमांडर सैफुल्लाह साजिदशी बातचीतच करत असल्याचं ट्रेस झालं आहे. या संवादादरम्यान 'अहमदवाला काम' हा कोडवर्ड वापरण्यात आला.   सूत्रांच्या मते, 'अहमदवाला काम' या कोडवर्डचा वापर हत्यारे मागवण्यासाठी केला जात आहे.   हत्यारांची जागा या संवादानुसार सैफुल्ला अबू दुजानाला सर्व हत्यारे योग्य ठिकाणी पोहोचवण्यास सांगत आहे. तसंच ही हत्यारे विविध ठिकाणी पोहोचवण्याच्या सूचन्याही देण्यात आल्या आहेत.   10 दहशतवाद्यांचा तळ गुप्तचर रिपोर्टनुसार, अबू दुजाना सध्या काश्मिर घाटीत 10 दहशतवाद्यांसह लपला आहे. तो त्या ठिकाणी एके 47 बंदुकांची मागणी करत आहे.   या सर्व गुप्त माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत.   संबंधित बातम्या RSS ची इफ्तार पार्टी, पाक उच्चायुक्तांना फोन कॉल, तुम्ही येऊ नका संघाकडून इफ्तार पार्टी, पाकसह अनेक मुस्लिम राष्ट्रांना निमंत्रण  जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद, तर 17 जवान जखमी दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावादी नेत्यांची हजेरी VIDEO: जवानांच्या गाडीसमोर उभं राहून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या