नागपूरः मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी 6 ते 11 जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक 01115 नागपूर-मिरज आषाढी विशेष 6 आणि 9 जुलैला नागपूर रेल्वेस्थानकावरुन सकाळी 8.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजरा मिरजला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक 01116 मिरज-नागपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 7 व 10 जुलैला दुपारी 12.55 वाजता मिरजवरून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपुरला पोहोचेल. गाडीमध्ये दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन राहील. दोन्ही गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, राम, धरणगाव, दारेगाव, रामगाव, महांकाळ, सलाग्रे आणि अर्ग या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
7 व 10 जुलै रोजी नागपुरहून प्रस्थान
याशिवाय रेल्वेगाडी क्रमांक 01117 नागपूर-पंढरपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 7 व 10 जुलैला रात्री 8.50 वाजता नागपूर स्थानकावरुन सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता पंढरपूरला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक 01118 पंढरपूर-नागपूर आषाढी विशेष रेल्वेगाडी 8 व 11 जुलैला सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथून सुटेल, दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूर स्थानकावर येईल. यात दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेच कम गार्डची ब्रेक व्हॅन राहिल. या विशेष गाड्यांची बुकिंग 27 जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर सुरू झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या