सातारा :  सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपुर्वी मिळाली. ही परवानगी सातारा पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून देण्यात आली होती. त्यानंतर  सातारा जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून काम करणाऱ्या तीन पोलीस अधीक्षकांनी ही परवानगी कायम ठेवली. मात्र, अचानक सातारचे विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सह्याद्री देवराई संस्थेला इथून पुढे म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही असे आदेश काढले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.


दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री देवराई संस्थेला शासकीय यंत्रणांनी मदत करावी, असा आदेश देखील काढला होता.  त्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि सातारच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्याची प्रशंसाही केली होती.  एवढच नाही तर सातारचे विद्यमान पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे देखील इथे वृक्षारोपणासाठी आले होते. मात्र अचानक अजयकुमार बन्सल यांनी सह्याद्री देवराई संस्थेला इथून पुढे म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत काम करता येणार नाही असे आदेश काढलेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.  मात्र, तीन वर्षांनंतर काम का थांबवण्यात येतेय, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेल नाही. पोलीस दलातील नोकरशाहीचा असा अजब अनुभव सयाजी शिंदेंच्या वाट्याला आला आहे.


सध्या देशाभरात सर्वच स्तरातून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्लोबल वर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. उशीरा का असेना सर्वांनाचं आता शाहणपण सुचलेलं आहे. या सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत. मराठी सिने सृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे यासाठी आवाज उठवला आहे. मी अन् माझे इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे आवाहन वेळोवेळी सयाजी शिंदे यांनी केले आहे. मोकळ्या जागेत, डोंगरावर सयाजी शिंजे यांच्या सह्याद्री देवराई  या संस्थेच्या माध्यमातून झाडे लावली जातात आणि जगवलीसुद्धा जातात.


महत्त्वाच्या बातम्या: