सोलापूर : उजनी धरणाच्या (Ujani Dam)  जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला  राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडूंन दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे . करमाळा (Karmala)  तालुका आणि इंदापूर तालुका (Indapur)  यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे . यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे . 


करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोसपणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतणारा असतो . यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत . तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . करमाळा येथून इंदापूरकडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी 100 किलोमीटरचा वळसा मारावा लागतो .यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो . मात्र बोटीतून केवळ 5 ते 7 किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो याचा विचार न बोटवाले करतात ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात.


सहा जण 20 तासानंतरही बेपत्ता


दुर्घटना झाल्यावर अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुन्हा या जलवाहतूकीकडे दुर्लक्ष करते आणि पुन्हा नवीन दुर्घटना समोर येते . या बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. बोट चालक देखील पुरेसा तयारीचा असल्याने दुर्घटनेवेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. असाच प्रकार काल कुगव ते कळाशी या दरम्यान घडलं आणि बोटीतून 6 जणांचा शोध 20 तासानंतर देखील लागू शकलेला नाही. 


झरे गावावर शोककळा


काल  उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे .  करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), हे अजून सापडलेले नाहीत . काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील  गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत .  भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत . झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे.गावात सकाळपासून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रत्येकाला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे . एनडीआरएफची टीम कडून सकाळी पासून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. मात्र अद्यापही एकाच देखील शोध लागलेला नाही.


उजनी जलाशयातून या मार्गावर चालते धोकादायक  बेकायदा जलवाहतूक


कालठण ते कुगाव (तीन लॉन्च)
कळाशी ते कुगाव (तीन लॉन्च)
गंगावळण ते वाशिंबे (तीन लॉन्च)
शिरसवडी ते चिकलठाण (दोन लॉन्च)
पडस्थळ ते चिकलठाण (दोन लॉन्च)
शहा ते ढोकरी (एक लॉन्च)
चांडडगाव ते पारेवाडी (चार ते पाच लॉन्च)


चिमुकले बुडाले भीमा नदीच्या पात्रात 


 झरे गावात गोकुळ दत्तात्रय जाधव हे आई, वडील, भाऊ,दोन बहिणी सोबत लहानाचे राहतात . काही वर्षांपूर्वी गोकुळचे लग्न कोमल यांच्या सोबत झाले होते. प्लम्बिंगचे काम करत गोकुळ जाधव आपली उपजीविका चालवत असे . आपल्या पाहुण्यांच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी   गोकुळ जाधव व  त्यांची पत्नी कोमल,दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कुगव येथून  दुपारी कळाशी कडे निघाले होते . यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली  आणि गोकुळ जाधव,कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले.


Video :



हे ही वाचा :


इंदापुरात भीमा नदीत जलसमाधी मिळालेली बोट 17 तासांनी सापडली, 6 जण बेपत्ताच, मृत्यूची दाट शक्यता