Raju Shetti : दूध दराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूरसह, सांगली, अहमदनगर जिल्हात दूध दराचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळं पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांची (दूध संघाची) ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलीय. ते पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. दूध दराचा प्रश्न गंभीर असताना मंत्री मात्र, काहीच बोलत नसल्याचे शेट्टी म्हणाले. 


गायीच्या दुधाला 34 रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. हा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी केली होती. सरकारने गायीच्या दुधासाठी महाराष्ट्रात 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रुपये दर देणे बंधनकारक असेल असा अध्यादेश जारी केला. सदरचा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांची शुद्ध फसवणूक असल्याचे शेट्टी म्हणाले.


स्वाभिमानी हाय जॅक करणे इतकं सोपं नाही


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता 8 ऑगस्ट रोजी शिस्त पालन समितीची बैठक आहे, त्या बैठकीत बोलावे असेही राजू शेट्टी म्हणाले. त्यांनी शंकेच निरसन करावे. स्वाभिमानी हाय जॅक करणे इतकं सोपं नाही, असेही शेट्टी म्हणाले. रविकांत तुपकरांनी पक्ष संघटनेतील नेतृत्वार उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं तुपकर स्वाभिमानी सोडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना शेट्टींनी सावध पवित्रा घेत शिस्त पालन समितीच्या बैठकीत रविकांत तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं असे मत व्यक्त केलं आहे. 


राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का नाही?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर हाय कोर्टाच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या मनात संशय असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आपल्या महापुरुषांची आपण पुजा करतो. येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, महात्मा गांधी ही साऱ्या जगाची दैवते आहेत. या दैवतांबद्दल अपशब्द करणे चूक आहे. सगळे मोदी चोर म्हंटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का कारवाई नाही? असा सवालही शेट्टींनी केला. दरम्यान, लोकशाही आघाडीसोबत आमची फसवणूक झाली आहे. त्यामुळं राज्यातील लहान लहान पक्षांची महाआघाडी करायचे प्रयत्न सुरु असल्याची शेट्टी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti on Ravikant Tupkar : पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल; रविकांत तुपकरांच्या नाराजीच्या चर्चेवर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?