Solapur News : सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भगवान नगर (Bhagwan Nagar) येथील पाणी टाकीजवळ एकाच ठिकाणी पती-पत्नीने आत्महत्या केल्याने सोलापुरात (Solapur News) एकच खळबळ उडाली आहे. विनायक पवार आणि पूजा देवी पवार अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विनायक पवार हे सोलापुरातील एक नामांकित पेंटर म्हणून ओळखले जात होते. त्यांचे लग्न पूजा देवी यांच्याशी नात्यातच झाले होते. पूजा देवी विनायक पवार यांच्या मामाची मुलगी होती. या दाम्पत्याला आठ वर्षांचा हर्ष आणि चार वर्षांची महालक्ष्मी अशी दोन मुले आहेत. विनायक आणि पूजा यांच्यात वारंवार घरगुती वाद होत होते. या वादांमुळे दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकाच ठिकाणी पती-पत्नीची आत्महत्या 

गुढीपाडव्याच्या मध्यरात्री विनायक पवार यांनी भगवान नगर झोपडपट्टीजवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनायक पवार यांचा मृतदेह खाली उतरवून पोलिसांनी पंचनामा करण्यात आला. पतीच्या आत्महत्येची बातमी पूजा देवी यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला होता. पतीच्या विरहाने व्यथित झालेल्या पूजा देवी यांनी त्याच ठिकाणी जात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेतकऱ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

दरम्यान, उन्हाळ्यात उष्णता शमविण्यासाठी आपल्या बैलांना अंघोळ घालण्यासाठी तळ्यात गेलेल्या एका शेतकऱ्याला पाण्यात बुडून स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यांच्या बैलजोडीपैकी एका बैलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे ही दुर्घटना घडली. अंकुश काशीनाथ शिरसाट (55) असे दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अंकुश शिरसाट यांनी आपल्या बैलजोडीला अंघोळ घालण्यासाठी गावानजीक सिद्धनाथ साखर कारखान्याच्या पाठीमागील तळ्यात नेले होते. बैलगाडी तळ्यात नेल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलगाडी तळ्यात मध्यभागी गेली आणि खोल पाण्यात उलटली. तेव्हा बैलांना वाचविण्यासाठी अंकुश शिरसाट यांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु ते स्वतः पाण्यात बुडाले. यात त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. बैलजोडीपैकी एका बैलाचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalna Crime News: दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं; जालन्यातील धक्कादायक घटना

Nashik : सिगारेटच्या किमतीरुन टपरी चालक आणि ग्राहकामध्ये तुंबळ हाणामारी, अवघ्या एका रुपयासाठी जीव गेला