सोलापूर: सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या (Maratha Reservation) साखळी उपोषणाला माढ्याचे (Madha) आमदार बबन शिंदे (Baban Shinde) यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या एका व्हायरल वक्तव्यप्रकरणी स्पष्टीकरण देत समाजाची दिलगिरी देखील व्यक्त केली. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. यामध्ये "तुम्ही समाजाचा ठेका घेतलाय का" अशा पद्धतीचे वक्तव्य बबन शिंदे यांनी केले होते. समाजमाध्यमावर ही क्लिप वायरल करताना काही जणांनी याचा संबंध मनोज जरांगे पाटील यांच्याशी केला होता. मात्र आपण हे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल बोललो नसून स्थानिक नेत्यांबद्दल बोलल्याचे स्पष्टीकरण बबन शिंदे यावेळी दिले. 


मराठा आंदोलनाला माझा कायम पाठिंबा राहिला आहे. जरी या व्हायरल वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं आमदार बबन शिंदे म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली. 


गावागावात पुढाऱ्यांना बंदी 


मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं असून आता यापुढे अन्न, पाणीच काय तर उपचारही घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन राज्यभर पसरताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 


आमची मुलं मरत असताना मजा बघू नका


मनोज जरांगे म्हणाले की, गावागावात आता पुढाऱ्यांना बंदी करा. ते इकडे येऊन काय करणार आहेत. त्या आमदारांनी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणावर आवाज उठवावा. आमची मुलं मरत असताना तुम्ही मजा बघू नका, जरा गांभीर्याने घ्या, अन्यथा झेपणार नाही. 


गावागावात साखळी उपोषण सुरू करा


ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करावं आणि इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या आंदोलनाच्या दरम्यान जर कुणाला काही झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. 


ही बातमी वाचा: