Sharad Pawar Group on Solapur Loksabha : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातून  निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar Group) पु्न्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. "आघाडीचा धर्म आम्ही पाळणार मात्र, सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी", असं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते यू. एन. बेरिया म्हणाले आहेत. सोलापुरातील (Solapur Loksabha) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


बेरिया म्हणाले, आघाडीचा धर्म आम्ही पाळणार मात्र सोलापूर लोकसभा लढवण्याची आमची देखील तयारी आहे. शरद पवार जो निर्णय देतील ते मान्य करून आम्ही काम करणार, असेही बेरिया यांनी स्पष्ट केले. एकिकडे प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा असताना शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मतदारसंघावर दावा करुन सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 


सलग दोन वेळेस सुशिलकुमार शिंदे यांचा पराभव 


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळेस देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे(Sushilkumar Shinde) यांचा पराभव पत्कारावा लागला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवख्या असलेल्या शरद बनसोडे यांनी शिंदेंचा पराभव केला. शरद बनसोडे यांना मोदी लाटेचा चांगलाच फायदा झाला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)  यांचा पराभव केला. 


सोलापुरात शरद पवार गटाकडून पदयात्रेचे आयोजन 


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधीर खरटमल आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. दरम्यान 6 मार्च रोजी शरद पवार गटाची नवीन चिन्हाच्या प्रचारासाठी आणि पदयात्रेसाठी आमदार रोहित पवार देखील राहणार उपस्थित आहेत. सोलापुरातील कोतंम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत या पदयात्रेची आयोजन करण्यात आले आहे. 


रामदास आठवलेंनी महायुतीकडे मागितली सोलापुरची जागा


आम्हाला सिरियसली घ्या. आम्हाला जर महायुतीने एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले म्हणाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिर्डी आणि सोलापूर हे मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिले जावेत, अशी मागणीही आठवले यांनी महायुतीकडे केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Loksabha Election: मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?