Solapur : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण छाया ठिकठिकाणी दिसत आहे. अशातच हातातील पीक जपण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच नीरा उजवा (nira ujwa kalwa) कालव्याचे सुरु झालेले पाणी अचानक बंद झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून बाग तोडून टाकली. नीरा उजवा कालव्यात (nira ujwa kalwa) फलटण भागात गळती झाल्याने सुरु असलेले पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले. 


शेतकऱ्याने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवत दीड एकर द्राक्ष बाग तोडून टाकली


दुरुस्तीनंतर पुन्हा आवर्तन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगूनही द्राक्ष बाग जळू लागल्याचेही शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. दरम्यान, नुकसान होत असलेले पाहून वैतागलेल्या कासेगाव येथील शेतकऱ्याने आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवत दीड एकर द्राक्ष बाग तोडून टाकली. समाधान ढोणे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. 


भाटघरचे पाणी आले असते तर आपल्याला ही बाग तोडायची वेळ आली नसती


सध्या प्यायलाही पाणी नाही, अशावेळी भाटघरचे पाणी आले असते तर आपल्याला ही बाग तोडायची वेळ आली नसती असे समाधान ढोणे (Samadhan Dhone) यांनी सांगितले. आता यातून उबदार यायला पाच वर्षे जाणार असून या बागेसाठी सात ते आठ लाखांचा खर्च केला होता, असेही ढोणे यांनी सांगितले . 


पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्यावे


अगदी गरजेची वेळ असताना पाण्याची वाट पाहत कासेगाव भागातील शेतकरी वाट पाहत होते. अगदी या पाण्यासाठी गावात गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरु झाले आहे. या सर्व निराश मानसिकतेमधून समाधान ढोणे या शेतकऱ्याने वैफल्यग्रस्त मनस्थितीत आज शेतातील उभ्या दीड एकर बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. दुष्काळाची दाहकता अजून वाढत जात असताना पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 


सोलापुरात भीषण दुष्काळ 


उजनी धरणात (Solapur) सध्या केवळ मायनस 44 टक्के म्हणजेच 37.71 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यात 20 मे पर्यंत मोठी घट होईल, अशी माहितीही समोर आली आहे. मान्सून सुरु झाल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये उजनी धरणात (Ujani Dam) पाऊस सुरु झाला नाही तर पाण्याची परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


सोलापूरकरांसाठी गुडन्यूज... उजनीतून पंढरीत पोहोचलं पाणी, दुथडी वाहू लागली चंद्रभागा