Solapur News सोलापूर: सोलापुरमधील मध्यवर्ती भागातील दोन महत्वाचे रस्ते आजपासून (Solapur News) वाहतुकीसाठी बंद होणार आहेत. सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक दरम्यान 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. पुलाचे आयुष्य संपल्याने रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने हे पूल पाडण्यात येणार असून नवीन पूल बांधण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा रस्ता तब्बल एक वर्षासाठी बंद असणार आहे. आज मध्यरात्री पासून हा रस्ता बंद होणार आहे. तर दुसरीकडे शहरातील विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी महाराज तलाव जवळ असलेल्या पुलाजवळ रेल्वेने तांत्रिक काम हाती घेतलंय. त्यामुळे हा रस्ता देखील 8 आणि 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या संपूर्ण काळात दोन्ही रस्ते बंद असताना पर्यायी मार्ग प्रशासनाच्यावतीने सुचवण्यात आले आहेत.

Continues below advertisement

14 डिसेंबर रोजी जेव्हा प्रत्यक्षात ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकम होईल तेव्हा रेल्वे वाहतुकीवर देखील यांचा मोठा परिणाम होणार आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते रात्री 7.30 असा तब्बल 11 तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सोलापूर यार्डातील सर्व ये-जा मेन लाईन आणि लुपलाईनवर वाहतूक बंद राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम म्हणून 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 9 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. 15 ते 18 डिसेंबर रोजी देखील काही वेळाचा ब्लॉक असल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. (Solapur Traffic News)

रस्ते वाहतूकीवर काय परिणाम? (Solapur News)

  1. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक दरम्यान पूल पाडण्यात येणार असल्याने हा रस्ता आज मध्य रात्रीपासून तब्बल 1 वर्ष राहणार बंद
  2. विजयपूर रोडवर छत्रपती संभाजी महाराज तलाव जवळील पुलावर तांत्रिक कामामुळे आज आणि उद्या दोन दिवस पाच तासासाठी वाहतूक बंद

रेल्वे वाहतुकीवर काय परिणाम होणार?

14 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या 9 गाड्या- (Solapur Pune Train Cancle)

  1. होस्पेट–सोलापूर डेमू
  2. सोलापूर–पुणे डेमू
  3. सोलापूर–होस्पेट डेमू
  4. वाडी–सोलापूर डेमू
  5. सोलापूर–दौंड डेमू विशेष
  6. हडपसर–सोलापूर डेमू
  7. दौंड–कलबुर्गी विशेष
  8. सोलापूर–कलबुर्गी विशेष
  9. कलबुर्गी–दौंड विशेष

मार्ग बदललेल्या 9 गाड्या-

Continues below advertisement

  1. म्हैसूर–पंढरपूर गोलगुंबझ (13 डिसें.) गदग–हुबळी–मिरज–पंढरपूरमार्गे धावेल.
  2. पंढरपूर–म्हैसूर गोलगुंबझ (14 डिसें.) — मिरज–लोनढा–गदगमार्गे धावेल.
  3. विजापूर–रायचूर—विजापूर पॅसेंजर होटगी–वाडी–सोलापूर बायपास मार्गे धावेल.
  4. तिरुअनंतपुरम–मुंबई एक्सप्रेस — गुंटकल–होस्पेट–हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.
  5. बंगळुरू–मुंबई उद्यान (13 डिसें.) — हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.
  6. मुंबई–बंगळुरू उद्यान (14 डिसें.) — पुणे–मिरज–गुंटकलमार्गे धावेल.
  7. एलटीटी–विशाखापट्टणम (14 डिसें.) — कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.
  8. पुणे–सिकंदराबाद शताब्दी — कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.

शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या-

पुणे–सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी एक्सप्रेस)

14 डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच येणार; तेथूनच पुण्याकडे परतणार.

हसन–सोलापूर एक्सप्रेस 13 डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंतच येऊन तिथून परतणार.

उशिराने सुटणाऱ्या गाड्या (13–14 डिसेंबर)-

कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस — 2 तास उशिराने कन्याकुमारी येथून सुटेल.

पुणे–कन्याकुमारी — 1 तास उशिराने पुणे येथून सुटेल.

कोणार्क एक्सप्रेस (दोन्ही दिशांनी) — 2 तास उशिराने सुटेल.

सिकंदराबाद–पुणे शताब्दी — 2 तास उशिराने सिकंदराबाद येथून सुटेल.

15 डिसेंबरला 2.5 तासांचा ब्लॉक-

सकाळी 11:10 ते 13:40

रद्द गाड्या-

  1. सोलापूर–होस्पेट डेमू
  2. होस्पेट–सोलापूर डेमू
  3. सोलापूर–पुणे डेमू

उशिराने सुटणाऱ्या गाड्या-

  1. रायचूर–विजापूर पॅसेंजर – 30 मिनिटे रायचूर येथून सुटेल.
  2. विजापूर–रायचूर पॅसेंजर – 30 मिनिटे विजापूर येथून सुटेल.
  3. पुणे–सोलापूर इंद्रायणी – 30 मिनिटे पुणे येथून सुटेल.
  4. सोलापूर–पुणे इंद्रायणी – 30 मिनिटे सोलापूर येथून सुटेल.

16–17 डिसेंबर (UP लाईन ब्लॉक – 3.5 तास)

दुपारी 2:10 ते 5:40

विजापूर–रायचूर पॅसेंजर होटगीपर्यंत येईल. आणि तिथूनच पुढे रायचूरकडे रवाना होईल.

कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस 30 मिनिटे उशिराने कन्याकुमारी येथून सुटेल.

18–19 डिसेंबर (DN लाईन ब्लॉक – 3.5 तास)- (Solapur News)

दुपारी 4 ते रात्री 7.30

सोलापूर–हसन एक्सप्रेस — 20 मिनिटे उशीर सोलापूर येथून सुटेल.

बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस — 40 मिनिटे उशीर बागलकोट येथून सुटेल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: