Ramesh Kadam : मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना सत्र न्यायालयानं मोठा झटका दिला आहे. रमेश कदमांवर मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चिती झाली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 300 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदमांवर आरोप निश्चित झाले आहेत. रमेश कदम आणि महामंडळाच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह एकूण 10 जणांवर आरोप निश्चिती झाली आहे. या सगळ्या आरोपींनी त्यांच्यावरील आरोप नाकारली आहे. याप्रकरणी  2015 मध्ये रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती. तर तब्बल 8वर्षांनी याप्रकरणी रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला होता.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांची 2012 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मातंग समाजाचे मोठे नेते म्हणून रमेश कदम यांची ख्याती आहे. परंतु 2015 साली याच अण्णाभाऊ साठे महामंडळात 312 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर दहिसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीत अपहार केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर आणखी पाच जिल्ह्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. कदम यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी जामीनावर बाहेर येऊन अपक्ष म्हणून लढवली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्वच गुन्ह्यात जामीन मंजूर केल्यानं त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. 

आठ वर्षे कारागृहात राहिल्यानंतर 2023 मध्ये रमेश कदम यांची जामिनावर सुटका झाली होती

आठ वर्षे कारागृहात राहिल्यानंतर 2023 मध्ये रमेश कदम यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.   सर्व आरोपांचा सारासार विचार करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळं त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो कर्जरूपाने होता, त्यामुळे तो आज ना उद्या परत येईलच असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणताही अपहार झाला नाही, असे सांगितले. गेल्या आठ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाले. त्यामुळं येत्या आठ ते पंधरा दिवसात ते मतदार संघात जाऊन आपल्या मूळ विधानसभा मतदारसंघाचा अंदाज घेणार आहेत. त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं रमेश कदम यांनी सांगितलंय.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल