सोलापूर : महानगरपालिकेच्या निवडणूक 2022 अनुषंगाने आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या 57 पैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 1 जागा अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात तर उर्वरीत 48 जागा या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत.  


सोलापूर महापालिकेतील आरक्षण खालीलप्रमाणे,


- एकूण सदस्य संख्या : 113
- एकूण प्रभाग : 38 


- एकूण महिला राखीव जागा : 57
- 57 पैकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग : 48
- 57 पैकी महिला अनुसुचीत जाती : 8 
- 57 पैकी महिला अनुसुचीत जमाती : 1 


अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 8 जागा)
5 अ,  9 अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28 अ , 33 अ, 36 अ,


अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 1)
35 अ


सर्वसाधारण महिला राखीव जागा (एकूण - 48)
1ब, 2अ, 2ब, 3अ, 4अ, 4 ब, 5ब, 6अ, 6ब, 7ब , 8ब,  9ब, 10ब, 11अ, 12अ, 13अ, 13ब, 14अ, 14ब, 15अ, 15ब, 16अ, 17अ, 17ब, 18अ, 19अ, 19ब, 20अ, 21ब, 22ब, 23ब, 25अ, 25ब, 26ब, 27ब,  28ब, 29अ, 30अ, 31अ, 31ब, 32अ, 32ब, 33ब, 34अ, 35ब, 36ब, 37अ, 38ब