मुंबई :  मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्जच्या (Drugs Racket) गोरख धंद्याचा मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. आता या सोलापुरातील (Solapur News) कारखान्यासंदर्भात एक अपडेट समोर येत आहे. सोलापुरातील एमडीच्या कारखान्यावर छापा टाकणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेला आरोपींकडे एक डायरी सापडली आहे. डायरीमध्ये एमडी किंवा मेफेड्रोन कसा बनवायचे यासंदर्भात माहिती आहे. 


मुंबई गुन्हे शाखेला मिळालेल्या  त्या डायरीत वेगवेगळी नावे आणि मोबाईल नंबर आहेत. ही नाव आणि नंबर एमडीची विक्री करणाऱ्याची आहेत.  एमडी सिंडिकेटशी  यांचा काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी पोलिस या मोबाईल क्रमांक आणि इतर तपशीलांची पडताळणी करत आहेत . मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपी हे दोघे भाऊ असून  एमडी तयार करणे तसेच ते मुंबई किंवा इतर शहरात पोहचवण्याचे काम करत होते.


सोलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. 


काय आहे प्रकरण?


मुंबई गुन्हे शाखेने सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी येथून एमडीची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी  16 कोटी रुपयांचे एमडी तसेच शंभर कोटी रुपयांचा कच्चा माल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. एकूण 116 कोटीचा माल एमडी गुन्हे शाखा आधिकाऱ्यांनी जप्त करून फॅक्टरी सील केली आहे. गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी एमडीची विक्री करण्यात आलेल्या राहुल गवळी आणि अतुल गवळी या दोघांना पाच किलो एमडीसह अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये या फॅक्टरीचा उलगडा होताच गुन्हे शाखेने चिंचोली एमआयडीसी येथील फॅक्टरीवर छापा टाकला.या छापेमारीत तब्बल 3 किलो एमडी जप्त करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार,  अटक करण्यात आलेले दोघे आरोपी दहावी नापास असून पूर्वी एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत होते. तिथेच त्यांनी एमडी कसं करायचं त्याचा प्रशिक्षण घेतल आणि त्यानुसार चिंचोली एमआयडीसी येथे 30, 000 रुपये प्रति महिना भाड्याने 21 हजार चौरस फुटी जागा घेतली. य जागेत त्यांनी एमडी बनवण्याचा कारखाना थाटला.  याआधी देखील त्यांनी फॅक्टरी फॅमिलीची निर्मिती करून  मुंबईच्या पश्चिम उपनगरात एमडी विकल्याचे तपासात समोर आला आहे.  आता याप्रकरणी आणखीन कोण शामिल होते याचा तपासणी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. 


हेही वाचा : 


Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे तपास अधिकारीच बदलले, नेमकं काय आहे ठोस कारण?