Solapur Crime: गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेकीचा प्रकार घडला आहे. सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकच्या मुलासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक आहे. ही घटना काल (रविवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. (Stone Pelting)
नेमकं घडलं काय?
काल रात्री 10 च्या सुमारास सोलापुरातल्या घोंगडे वस्ती परिसरातील रऊफ इनामदार अनैतिक त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफ इनामदार याने गाडीचा हॉर्न वाजवत रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफ इनामदार यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर आधी भांडणात झाले त्यानंतर दोन्ही गटाचे सुमारे तीनशे हुन अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आला. आणि दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत माजी नगरसेवक बिपीन पाटील याच्यासह दोन्ही गटातील 7 जण जखमी झालेत. तर परिसरातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आक्रमक भूमिकेत घटनास्थळी गर्दी केलेल्या तरुणांना पोलिसांनी पांगवले. रात्री उशिरा जखमीना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय.
तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन
राज्यभरातून महिला अत्याचाराच्या व एकूणच गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)
ही घटना मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. एका महिलेला वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट हवे असल्याने ती संबंधित आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेली होती. तपासणी करत असताना आरोग्य केंद्रातील डॉक्टर अमित गायकवाड याने तपासणीच्या नावाखाली महिलेस अश्लीलरीत्या स्पर्श केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरली, मात्र तिने धाडस दाखवत थेट पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली.