Ashadhi Wari Pandharpur : आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा जवळ येत आहे. लाखो वारकरी पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेनं आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होत आहेत. या काळात रस्त्यावर ठिकठिकाणी उघडपणे मास मटन विक्रीची दुकाने मार्गात लागत असतात. याशिवाय पंढरपुरात (Pandharpur) प्रवेश करतानाही विविध मार्गावर अशी मास मटन विक्रीची दुकाने आहे. गेल्या अनेक वर्षापासून पालखी सोहळा प्रमुख आणि वारकरी संप्रदायाचे संत मंडळी यांनी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील आणि पालखी सोहळा येताना संबंधित गावातील मास मटन विक्री बंद ठेवण्याची मागणी करत होते. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. यंदा प्रथमच आषाढी वारीच्या इतिहासात यात्रा कालावधीतील सलग 10 दिवस पंढरपुरातील मास मटन विक्रीस बंदी करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरात सलग 10 दिवस मास मटन विक्रीस पूर्णपणे बंदी
यावर्षी पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आषाढी एकादशी पूर्वी सात दिवस व एकादशीनंतर तीन दिवस पंढरपूर शहरातील मास विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील मास मटन विक्रीस यात्रा कालावधी मध्ये दहा दिवस पूर्णपणे बंदी घातली आहे. दरवर्षी केवळ तीन दिवस ही बंदी असायची मात्र आता वारकऱ्यांच्या आग्रही मागणीनंतर पंढरपूर शहरात सलग 10 दिवस मास मटन विक्रीस पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
ज्या गावात पालखी येईल तिथेही त्या दिवशी मास विक्रीस बंदी
दरम्यान, याच पद्धतीने पालखी मार्गावर ज्या दिवशी पालखी ज्या गावात प्रवेश करेल आणि त्या गावातून प्रस्थान ठेवेल तेवढा संपूर्ण कालावधी संबंधित गावातील मटन विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. याचे वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या मागणीला अखेर फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ
दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आज पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर येथे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या: