Solapur Crime : सोलापुरात एसटी बसेसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. सोलापूर आगारातून जाणाऱ्या तीन एसटी बसेसला आंदोलकांनी लक्ष केले आहे. सोलापूर-सातारा, सोलापूर-तुळजापूर, तुळजापूर-पुणे या ठिकाणी जाणाऱ्या बसेसची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली आहे. परभणीतील घटनेवरून राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीन एसटी बसेसच्या काचा फोडल्याची घटना घडलीये. 


पोलीस संरक्षणानंतर सोलापूर आगारातील एसटी वाहतूक सुरळीत


अधिकची माहिती अशी की, सोलापुरातील विविध भागात एसटी बसेस फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान एसटी बसेस फोडल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. एसटी स्टँड परिसरातून शहराबाहेर जाईपर्यंत एसटी बसेसला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस संरक्षणानंतर सोलापूर आगारातील एसटी वाहतूक सुरळीत झाली आहे. 


डी मार्ट चौकात आणि सम्राट चौकात गाड्या फोडण्यात आल्या


वरिष्ठ आगार प्रमुख उत्तम जुंदळे म्हणाले, दुपारी चार वाजण्याच्या नंतर एकूण तीन बसेसवर अज्ञान व्यक्तींनी दगडफेक केली आहे. बसेसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीनंतर वाहतूक सुरुवात झाली. डी मार्ट चौकात आणि सम्राट चौकात गाड्या फोडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. याचा तपास सुरु करण्यात आलाय. 


सोलापूर ब्रेकिंग : 


- सोलापुरात एसटी बसेसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक 


- सोलापूर आगारातून जाणाऱ्या तीन एसटी बसेस ला आंदोलकांनी केले लक्ष 


- सोलापूर-सातारा, सोलापूर-तुळजापूर, तुळजापूर-पुणे या ठिकाणी जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या 


- परभणीतील घटनेवरून राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीन एसटी बसेसच्या काचा फोडल्याच्या घटना 


- सोलापुरातील विविध भागात एसटी बसेस फोडल्याच्या घटना समोर 


- दरम्यान एसटी बसेस फोडल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर 


- एसटी स्टँड परिसरातून शहराबाहेर जाईपर्यंत एसटी बसेसला दिले पोलीस संरक्षण 


- पोलीस संरक्षणानंतर सोलापूर आगारातील एसटी वाहतूक सुरळीत







इतर महत्त्वाच्या बातम्या 


Kurla Best Bus Accident: 8 वाहनांना उडवत मार्केटमध्ये घुसली; महिला बस अन् कारमध्ये अडकली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार


मोठी बातमी : लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड, मुंबईतील नामांकित शाळेत 'बदलापूर'सारखी घटना