Mumbai Crime News : मुंबईच्या भांडुप (Bhandup) येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भांडुपमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत पुन्हा एक 'बदलापूर' (Badlapur) सारखीच घटना उजेडात आली आहे. यात लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड केल्याची घटना घडली आहे. शाळेत योगासन शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विद्यार्थीनीनी या बाबत माहिती दिल्याने प्रकार उजेडात आला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील नामांकित शाळेत 'बदलापूर'सारखी घटना
मिळालेल्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 1.30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यात शाळेच्या बेसमेंटमध्ये 10 वर्षीय एक तर 11 वर्षीय दोन विद्यार्थीनी योगा करत होत्या. दरम्यान शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या चिमुकलींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर घडलेल्या या प्रकाराची तक्रार विद्यार्थीनीनी योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या कुटुंबीयांकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता बेसमेंटमध्ये असलेले सीसीटिव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकरणाची सत्यता उजेडात आली. धक्कादायक बाब म्हणजे, लिफ्ट ग्राऊंड फ्लोवरवर संपते. मात्र लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचारी बेसमेंटमध्ये पडद्याच्यामागे लपल्याचे आढळून आला.
विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून शाळेवर आरोप
या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे. यात भारतीय न्याय संहिता 74, 78 आणि POCSO 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पोलिसांपर्यंत जायला नको, या साठी शाळेकडून पलाकांवर दबाव टाकण्यात आला. तसेच जेव्हा पालक शाळेत गेल्यावर सीसीटिव्हीची तपासणी करायची मागणी केली असता त्याने शाळेकडून सहकार्य न केल्याचे आरोपही पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या