Shahajibapu Patil : रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटील (Mohite Patil) आणि माझा इतिहास संपायचा नाही असे म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी टोलेबाजी केली. 50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचे पाणी त्यांनी अडवले असल्याचे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली. तर रणजितसिंह निंबाळकरांनी (Ranjeetsingh nimbalkar) डाव्याचे पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता असेही शहाजीबापू म्हणाले. त्यामुळं निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असे शहाजीबापू पाटील म्हणाले. सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केली.
शहाजीबापूंची मोहिते पाटलांवर टोलेबाजी
2014 च्या निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील माझ्याकडे आले होते. दुपारी एक वाजता आले होते, ते सायंकाळी सहा वाजता गेले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत आहे. त्यांना पक्षानं तिकीट दिलं, त्यानंतर ते मला पाणी आणू, असं करु तसं करु म्हणाले होते. सहा तास विजयदादा माझ्याशी गुळापेक्षा गोड बोलल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही दिपकआबा साळुंके पाटील कशाला घेतला? असे सवाल मोहिते पाटलांकडून होऊ लागल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. दिपकआबा साळुंखे माझ्यासोबत नसते तर मी आमदार झालो नसतो असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. दरम्यान, रणजितसिंह निंबाळकर हाच माणूस सांगोल्याच सोनं करु शकतो. त्यांना मत द्या असेही पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणार तालुका सांगोला
50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याचे पाणी मोहिते पाटलांनी अडवून ठेवलं आहे. त्यामुळं त्यांना मत द्यायचे का? असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणार तालुका सांगोला आहे. केवळ 32 टक्के पाऊस पडल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले.
सांगोला तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर हे सांगोला तालुक्यात लोकसभेचा प्रचार करत आहेत. या प्रतारानिमित्त आयोजीत केलेल्या सभेत बोलताना शबाजीबापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. तसेच मोहिते पाटील यांच्यावर टीकाही केली.
महत्वाच्या बातम्या:
Shahajibapu Patil: संजय राऊत नाही... हे तर संजय 'आगलावे', त्यांनीच शिवसेना संपवली; शहाजीबापू पाटील यांनी डागली तोफ