Shivacharya kolekar maharaj passed away : कोळे मठाचे शिवाचार्य तिसावे पिठाधिश श्री. गुरु मुर्ती निर्वाण रुद्र पशुपती श्री. श्री. श्री. 108 शिवाचार्य कोळेकर महाराज यांचे निधन (Shivacharya kolekar maharaj passed away) झाले आहे. कोल्हापूर येथे उपचार दरम्यान त्यांचे महानिर्वाण झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मिरज येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. कोल्हापूरमध्ये उपचारादरम्यान, त्यांचं निधन झालं.
महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील विविध भागात 150 लिंगायत मठ त्यांच्या अधिपत्याखाली
श्री 108 शिवाचार्य राजेंद्र स्वामी कोळेकर महाराज यांचे काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठात उच्च शिक्षण झाले होते. काशी मठाचे पंचाचार्य डॉ चंद्रशेखर पंचाचार्य यांचेकडून वीरशैव तत्वज्ञान अभ्यास केला होता. त्यांनी तत्वज्ञान या विषयात विशारद पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी शिवाचार्य दिक्षा घेतली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील विविध भागात सुमारे 150 लिंगायत मठ त्यांच्या अधिपत्याखाली आहेत. वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी परिश्रम घेतले होते.
वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आयुष्यभर घेतलं परिश्रम
शिवाचार्य कोळेकर महाराज यांनी वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले होते. दरवर्षी कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी चा प्रारंभ केला होता. 11 अग्निहोम अनुष्ठान निराहार राहून केले होते. पहिला अग्नी होम रेवण सिद्ध येथे प्रारंभ केला होता. महाराष्ट्र कर्नाटक राज्यात लिंगायत धर्माचा प्रसार करुन हजारो प्रवचने दिली आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण विचार विवेचन करुन भक्तांना धर्मरत करण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्म कार्य केले. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही महाराजांचे लाखो शिष्य धर्मरत आहेत. त्यांच्या निर्वाणाचे वृत्त समजताच सांगोला कोळे शहरातील व्यापारी यांनी व्यापारी पेठ बंद करून शोक व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
अजब प्रेम की गजब कहानी... पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात दोघांवर अंत्यसंस्कार