PM Narendra Modi In Solapur : सोलापूर (Solapur) येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण सोहळ्यात बोलतांना मोदी म्हणाले की, “आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असल्याचे मोदी म्हणाले. 


पुढे बोलतांना मोदी म्हणाले की,"जे आपण दुःख आणि कष्ट बघितले ते आपल्या मुलांना बघायला लागणार नाही. 22 जानेवारीला तुम्ही जो दीवा लावणार आहात, तो तुमची गरिबी दूर करणारा असेल. आपलं जीवन सुखमय व्हावे ही प्रभू रामाची इच्छा आहे. देशात सु-शासन आणि इमानदारी हवी, जनता सुखी करण्याचे काम प्रभू राम चंद्र करत असत, मी 2014 ला सांगितले होते माझे सरकार गरिबांना समर्पित असेल. शौचालय नसल्याने गरिबांना अपमानित व्हावं लागतं होते. आम्ही 10 करोडपेक्षा अधिक शौचालय दिले. देशातील 4 करोड गरिबांना आम्ही घर दिले.", असं मोदी म्हणाले. 


माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटीमधून 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरवातीलाच, 'पंढरपूरच्या विठ्ठलालाला आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमन करत असल्याचे म्हणत भाषण सुरु केले. 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण येणार आहे. आपले भगवान राम आपल्या मंदिरात विराजमान होतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 11 दिवस साधना करणार आहे. तुमच्या आशिर्वादानं मी तिकडे जाणार आहे. माझ्या अनुष्ठानची सुरुवात महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाली. आज 1 लाख पेक्षा जास्त परिवाराचा गृहप्रवेश होईल, असे मोदी म्हणाले. 


मोदी भावूक झाले


"माझा आनंद वाढणार की नाही. सर्वजण आपल्या घरात राम ज्योती प्रजवलीत करणार की नाही, आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होतोय. देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकापर्ण झालं असल्याचे मोदी म्हणाले. मला पण लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, असं म्हणत मोदी भावूक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवलं आणि आवंढा गिळला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कंठ दाटला, आवंढा गिळला; लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, सोलापुरात मोदी भावूक