Ranjitsinh Mohite Patil, अकलूज : "सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायची माझी तयारी आहे", असं म्हणत भाजपचे विधानपरिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मोठे संकेत दिले आहेत. अकलूजमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठं भाष्य केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते.
रणजितसिंह मोहिते पाटील महाविकास आघाडीसोबत जाणार का?
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून देखील आले. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. आताच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते देखील महाविकास आघाडीचे काम करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महायुतीचे नेते जातीय दंगे कसे होतील हे पाहण्याचे काम करत आहेत
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक निकाल लागेपर्यंत राज्य सरकार झोपलं होतं. मात्र जसा निकाल लागला तसा जागे झाले आणि दिसेल त्याला लाडके करायला लागले. समाजात तेढ कसे निर्माण होईल, जातीय दंगे कसे होतील हे पाहण्याचे काम करत आहेत. सध्या तिजोरीच्या दर काढून ठेवले आहेत. देशातील सर्वात जास्त घाबरलेले सरकार आहे. लोकसभेत घेतलेली भूमिका विधानसभेत घ्या, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केलं.
नितीश कुमार उर्फ पलटू राम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमचा भरवसा...
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, 405 पारची भाषा करणारे 210 वर आले. आता दोन टेकूवर केंद्र सरकार आहे. नितीश कुमार उर्फ पलटू राम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमचा भरवसा आहे. सकाळी उठले की कळेल सरकार पडले असेल. बेरोजगारी , महिला सुरक्षा , शेतमालाला भाव नाही असे अनेक प्रश्न राज्यात आहेत. जालना पासून नांदेडकडे जाणारा रस्ता होता, त्याचे अकरा हजार कोटींचं टेंडर 15000 कोटीला गेले. अलिबाग पासून विरार पर्यंतचा एक कॉरिडोर 96 किलोमीटर रस्ता हा 20000 कोटीचा टेंडर 26000 कोटी वर गेलं. आज अलिबाग पासून विरारपर्यंत जायला एका किलोमीटरला 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या