Raja Shiv Chhatrapati Mahakavya: छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) व्यक्तिमत्त्वाने प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या निष्ठेसाठी अवघ्या तीन महिन्यांत या युवकानं  'राजा शिव छत्रपती महाकाव्य' (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) रचलं आहे. अहमद मोहम्मद शेख (Ahmad Mohammed Shaikh) असं या मुस्लीम  शिवभक्ताचं नाव आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या निमित्ताने 'महाशिवकाव्य' लिहून अहमद यांनी शिवरायांना आदरांजली अर्पित केली आहे. 


अहमद शेख हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब गावचे रहिवासी आहेत. ते सध्या पुणे इथं वास्तव्यास आहेत. पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी रीसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तर त्यांची पत्नी संगणक अभियंता आहे. त्यांनी लिहलेल्या राजा शिव छत्रपती महाकाव्यासंर्भात एबीपी माझाने त्यांची संपर्क साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा


छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप लिखाण उपलब्ध आहे. मात्र, काव्य स्वरुपात फार लिखाण कोणी केलेलं नाही. 'राजा शिव छत्रपती महाकाव्य' लिहण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचीचं प्रेरणा असल्याचे अहमद शेख म्हणाले. भूतो न भविष्यतो असा राजा कधी झाला नाही. रयतेच्या शेताची, रयतेच्या घरांची, नात्यांची तळागाळातील व्यक्तिची चिंता असणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजे होते असे अहमद शेख म्हणाले. कायम रयतेची काळजी करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. शेतकऱ्यांचा सारा माफ करणं, त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळवून देण्याचं काम महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमक मोठा होता. हार्ट टू हार्ट कनेक्ट असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.  म्हणूनच स्वराज्य उभं राहिल्याचे अहमद शेख म्हणाले.




शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं विस्तारत गेलं याची माहिती


'राजा शिव छत्रपती महाकाव्यात' ज्या गोष्टीमुळं वाद होतील त्या गोष्टी टाळल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग लिहले आहेत. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रसंगाची माहिती या महाकाव्यात दिल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य कसं विस्तारत गेलं, याची माहिती काव्यस्वरुपात यामध्ये मांडली आहे. सिंहगडावरचा प्रताप, अफजलखानाचा प्रसंग, पुरंदरचा तह, आग्र्याचा प्रसंग, रायगडावरील, राजगडावरील प्रसंग, आरमार याबाबतची माहिती या काव्यात देण्यात आल्याचे शेख म्हणाले. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे दुर्दैवी


दरम्यान, जो इथला मूळ मुस्लिम आहे, त्याला इथल्या मातीचा अभिमान आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज वंदनिय असल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली. मात्र, आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जाते हे दुर्दैवी असल्याचे शेख म्हणाले. त्यामुळं कोणीही चुकीच्या वक्तव्यांना थारा देऊ नये असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाजार वाचले पाहिजेत. दर वेळेस आपल्याला महाराज वेगळे सापडतील. कधी ते कृषीप्रधान तर कधी प्रजापती तर कधी अधिपती वाटतील. महाराज हे सामान्यांचे राजे होते असे असे अहमद शेख म्हणाले.


तरुणांनी वाचलं पाहिजे


आजकालच्या तरुणांनी वाचलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळणार नाही. छत्रपती शिवाजी माहाराजांचे कार्य आपल्याला माहित होणार नाही. युद्ध आणि धर्मासह छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कामं केली असल्याचे अहमद शेख म्हणाले. वाचल्याने महाराज समजतील. लिहण्याचा प्रयत्न करा. मोबाईलपासून दूर राहा असा सल्लाही अहमद शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.


साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी


राजा शिव छत्रपती महाकाव्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी आहेत असल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली. रविद्र घाटपांडे यांच्या स्नेहल प्रकाशनतर्फे (पुणे) या राजा शिव छत्रपती महाकाव्याचे प्रकाशन होणार आहे. हे काव्य लिहण्याची संकल्पना मुंबईचे मित्र यदुनाथ देशपांडे सुचवली होती असे अहमद शेख म्हणाले. पुढच्या महिनाभरात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे शेख म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


Sindhudurg News : भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा