सोलापूर: या आधीच्या निवडणुका या तत्वांवर लढल्या गेल्या, पण भाजपने यावेळी अनेक चुकीच्या मार्गांचा वापर केला, धार्मिक धृवीकरण केलं तरीही आपण जिंकलो असं खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असेल, त्यामुळे कामाला लागा अशा सूचनाही प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. सोलापुरातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला आहे. 


काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? 


'अभि तो नापी मुट्ठीभर जमीन, अभि पुरा आसमान बाकी है' या शायरीच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, संसदेत जाणं आणि तो क्षण काय होता हे मी शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. शपथ घेताना मी आई वडिलांकडे पाहिलं. या संसदेत तुम्ही सर्वानी मला पाठवलं, मी अतिशय विनम्रतेने तुमच्यासमोर नतमस्तक आहे. 


मी एकटी प्रणिती शिंदे म्हणून निवडून आलेले नाही, ही निवडून तुम्ही जिंकली आहे. या आधीच्या निवडणुका तत्वावर लढल्या गेल्या, ही लोकशाहीची निवडणूक होती. भाजपने ज्या ज्या गोष्टी निवडणुकीत वापरल्या त्या कोणत्याही काँग्रेसला वापरव्या लागल्या नाही, तरीही आपण निवडणूक जिंकलो. तुमची स्वप्न पूर्ण करणे हे माझे स्वप्न, केवळ मी खासदार नाही तर तुम्ही देखील खासदार झाला आहात. 


मागच्या दहा वर्षात कुठंतरी खचले होते, पण आता आशेची किरण पाहायला मिळतोय. मी खासदार झाल्याचा विश्वास अजूनही बसत नाही. तुम्ही दिलेली जबाबदारी अतिशय गांभीर्याने स्वीकारते, माझ्याकडून चूक झाली तर कान पकडून खाली बसवा. जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत. लोकांना निवडणुकीत त्रास सहन करावा लागला. शहरात भाजपने जातीय धृवीकरण करण्याचा प्रयत्न केले. योगी, मोदी आले पण कोणीही टिकलं नाही. 


काही लोक मॅनेज होऊन त्यांच्याकडे गेल्याच्या गोष्टी देखील कानावर आल्या. पण आता विधानसभा निवडणुका आहेत, भाजपच्या प्रचाराला बळी पडू नका. अयोध्येतमध्ये देखील भाजप निवडून येऊ शकली नाही हे तुम्ही लोकांना सांगा. जात-पात मुद्यावर निवडणूक होतं नाही हे तुम्ही आता सांगितलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असतो, त्यामुळं आता आपण पुन्हा कामाला लागलं पाहीजे. 


ही बातमी वाचा: