पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर पंढरपुरात (Pandharpur) कार्तिकी पूजेचा (kartiki Ekadashi) मुद्दा चांगलाच रंगला होता. आता याच मुद्द्यावर मंदिर समिती आणि प्रशासन सोमवारी स्थानिक मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहे. कार्तिकी पूजा (Kartiki Ekadashi) उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते करण्याबाबत शासन आणि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरु आहेत. या गोंधळाचा त्रास सर्वसामान्य वारकरी भक्तांना जाणवू नये याबाबतही प्रशासन खबरदारी घेत असले तरी आता शासनाच्या निर्णयानंतर कार्तिकीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार अजित पवार करणार की कोण करणार हे देखील लवकरच समोर येणार आहे.
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत कोणत्याही आमदार , खासदार अथवा मंत्र्याला पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही आणि कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिला होता. मात्र काल ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी या विषयावर जोरदार टोलेबाजी केल्यानंतर पुन्हा एकदा कार्तिकीची पूजा कोण करणार यावर चर्चेला सुरुवात झाली आहे. मंदिर समितीने मराठा आंदोलकांनी बैठकीच्यावेळी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण देणार नसून मराठा समाजाच्या भावना शासनाला कळवू अशी भूमिका घेतली होती.
शासन आणि प्रशासन अॅक्शन मोडवर
दरम्यान जरांगे आणि शासनाच्या बैठकीत तोडगा निघाल्याने 1 डिसेंबर पासून राज्यभर साखळी उपोषणे करण्याच्या सूचना जरांगे यांनी समाजाला दिल्या आहेत. कार्तिकी यात्रेपासून उपमुख्यमंत्र्यांनी रोखण्याच्या पंढरपूर येथील समाजाच्या भूमिकेबाबत अजूनतरी जरांगे यांनी कोणतेही वक्तव्य केले नसले तरी स्थानिक आंदोलक आपल्या मागणीवर अजूनतरी ठाम आहेत. यासाठीच मंदिर समिती आणि प्रशासन पुन्हा सोमवारी या आंदोलकांशी चर्चा करणार असले तरी दुसऱ्या बाजूने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्याबाबत प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली आहे. या गोंधळाचा त्रास सर्वसामान्य वारकरी भक्तांना जाणवू नये याबाबतही प्रशासन खबरदारी घेत असले तरी आता शासनाच्या निर्णयानंतर कार्तिकीची पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार अजित पवार करणार की कोण याचा निर्णय सोमवारपर्यंत येणे अपेक्षित आहे . छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने काळाच्या महामेळाव्यात कार्तिकी पूजेबाबत होत असणाऱ्या विरोधाचा समाचार घेतला त्यानंतर शासन आणि प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. आता मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा जरांगेच्या हस्ते करा
कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी रोखण्याचा निर्णय पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी घेतल्याबाबत देखील मनोज जरांगे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता थेट त्यांच्याच हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी आरक्षण वेळेवर द्यावेच, शिवाय समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे याना महापूजेसाठी निमंत्रित करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.