NCP Sunil Tatkare In Pandharpur: पार्थ पवार (Parth Pawar) कधीच अस्वस्थ असू शकत नाहत, त्यांनी शंभूराजे यांची कोणत्या कारणाने भेट घेतली. याची मला माहिती नसली तरी राष्ट्रवादीत पार्थ पवारच काय कोणीच नाराज असण्याचे कारण नाही, असं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. आज विठुरायाच्या दर्शनासाठी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) पंढरपूरमध्ये (Pandharpur News) आले होते. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादावरील स्पष्टीकरण दिलं. त्याशिवाय भाजप अन् एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
अनेक वेळा सत्तातर झाल्यानंतर काही सहकारी इकडे तिकडे जात असतात. सोलापूर येथील महेश कोठे मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांचा काही गैरसमज असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. सत्तांतरानंतर कोणी सहकारी राष्ट्रवादीपासून फारकत घेणार नाही, यासाठी आम्ही सात्रक राहणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
'बाळासाहेबांच्या नावाने सुरु होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण नसेल तर दुर्दैवी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई येथे येत असताना उद्धव ठाकरे यांचे पत्रिकेत नाव नसल्याचं समजलं, स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने सुरु होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण नसेल तर दुर्दैवी आहे, असे तटकरे म्हणाले. काही कार्यक्रम पक्षाच्या पलीकडचे असतात अशावेळी राज्य सरकारने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना बोलावणे हे राज्य सरकारचे कर्तव्य ठरत असते, असा टोला शिंदे फडणवीस यांना लगावला. पंढरपूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भाजप आमदाराच्या गोटात सामील झाल्याबाबत छेडले असता सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून यातून कोण कुणीकडे गेले यामुळे फारसा काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शरद पवार यांना बोलावण्याचा मोठेपणा दाखवणे गरजेचे होते. पण काहींची मनं छोटी असतील. ज्यांना बोलावले त्यांचा कुस्तीसोबत कितपत संबंध होता, असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला. रत्नागिरीचे माजी आमदार संजय कदम हे ज्येष्ठ सहकारी असून माझ्याशी चर्चा केल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेणार नाहीत, असे सांगत संजय कदम यांच्या पक्षा बदलाबाबत सुरु असणाऱ्या बातम्यांना पूर्णविराम दिला.
आणखी वाचा:
IND vs NZ : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट
शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!