Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेच, त्याशिवाय आर्थिक फटकाही बसत होता. पण पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी भाऊ पुढे आले आहेत. अनेकांनी महिलांना मोफत अर्ज भरून देण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरमधील या प्रकाराची सोलापुरात जोरदार चर्चा सुरु आहे.


सध्या राज्यभर माता भगिनींची तहसील आणि तलाठी कार्यालयात तुफानी गर्दी झाली आहे. असे असताना पंढरपूर शहरात मात्र सामाजिक कार्यकर्ते भाऊ म्हणून पुढे आले आहेत.  त्यांनी या सर्व महिलांचे मोफत अर्ज दाखल करून देण्यास सुरुवात केली आहे. आज विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणि इतर परिसरात पाच ठिकाणी असे कॅम्प सुरु केले आहेत. येथे कार्यकर्ते मोफत अर्ज आणि कागदपत्रे देत असून अर्ज भरून ऑनलाईन दाखल करून देत आहे. त्यामुळे महिलांचे हाल कमी झाले आहेत, त्यांना होणारा त्रास कमी झालाय. 


पंढरपूरात आज सकाळी पहिला कॅम्प सुरु करताच अवघ्या दोन तासात 500 पेक्षा जास्त महिलांचे अर्ज भरून देण्यात आले. या परिसरात झोपडपट्टीचा भाग जास्त असल्याने गोरगरीब महिलांना एकाच जागेवर शिरसाट यांनी ही सोया करून दिली आहे. यासाठीच सर्व खर्च शिरसाट कुटुंब करीत असून अर्जांपासून झेरॉक्सपर्यंत आणि अर्ज भरण्यापासून ऑनलाईन दाखल करेपर्यंत सर्व कामे शिरसाट यांच्यामार्फत करण्यास सुरुवात झाली आहेत. शहरात पाच ठिकाणी असे कॅम्प विक्रम शिरसाट यांनी सुरु केल्यानंतर तहसील आणि तलाठी कार्यालयात झालेली गर्दी आता इकडे मोफत अर्ज दाखल करण्यासाठी येऊ लागली आहे. प्रत्येक कॅम्प मध्ये अर्ज भरून घेण्यासाठी चार टेबल , अर्ज तपासणीसाठी 3 टेबल ठेवल्याने पटापट लाडक्या बहिणींचे अर्ज हे भाऊ दाखल करून देत आहेत. याच पद्धतीने राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतल्यास आपल्या माता भगिनींचा त्रास संपून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? 



  • योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल. 

  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा  उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं

  • पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • रेशनकार्ड

  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र