Chandrabhaga River News : चंद्रभागेच्या पात्रात (Chandrabhaga River) सध्या मोठ्या प्रमाणात वाळू (sand) उपसण्याचे काम सुरु आहे. नदीच्या पात्रात वाळू माफियांनी जीवघेणे खड्डे पाडले आहेत. या खड्ड्यांमुळं भाविकांना धोका निर्माण झालाय. यातून जर भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर महसूल अधिकाऱ्यांवर (Revenue Officers) गुन्हे दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी (Social Workers) दिला आहे.
वाळू उपसा करुन चंद्रभागेच्या पात्राची केली चाळण
प्रशासन निवडणूक प्रक्रियेत अडकले असताना वाळू माफियांनी चंद्रभागेच्या पात्रात वाळू उपसा करुन अक्षरश चाळणी केली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठा मोठ्या खड्ड्यांमुळे भाविकांचे जीव धोक्यात आले आहेत. सध्या चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले असले तरी उजनी धरणातून सोलापूरला सोडलेले पाणी उद्यापर्यंत चंद्रभागा पात्रात पोहोचणार आहे. या पाण्याखाली हे जीवघेणे खड्डे बुडले जाणार असल्याने स्नानासाठी उतरलेल्या भाविकांना या खड्ड्यांचा अंदाज येणार नाही. यामुळं भाविकांच्या जीवाचा धोका वाढणार आहे. दरम्यान, या स्थितीत देखील प्रशासन वाळू माफियांकडे दुर्लक्ष करत आहे. रोज नवनवीन खड्ड्यांची यात भर पडत आहे.
भाविकांचा जीव गेला तर महसूल अधिकाऱ्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करणार
वाळू माफियांवर कारवाई करायची नसेल, तर प्रशासनाने करु नये मात्र किमान पात्रात पडलेले हे खड्डे तरी तातडीने बुजवावेत अशी मागणी महर्षी वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. मात्र, अजूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं दुर्दैवाने या खड्ड्यात भाविकांचा जीव गेला तर संबंधित महसूल अधिकाऱ्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा अंकुशराव यांनी दिला आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक पंढरपूरमध्ये येत आहेत. सध्या जरी चंद्रभागेचे पात्र कोरडे असले तरी येत्या दोन दिवसात सोलापूरची सोडलेल्या पाण्यामुळं पुन्हा चंद्रभागा दुथडी भरून वाहणार आहे. अशावेळी चंद्रभागेत उतरलेल्या भाविकांना या जीवघेण्या खड्ड्याचा अंदाज येऊ शकणार नाही. यातच भाविक बुडाल्याच्या दुर्घटना घडू शकतात. यामुळेच प्रशासनाने तातडीने हे खड्डे बुजवावीत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. खुलेआम वाळू माफिया नदीतील वाळू काढत आहेत. मात्र, प्रशासन वाळू माफियांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या: