माढा : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माढा तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते नशा करताना दिसत असून, त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाबाराजे जगताप यांचा नशेचा व्हिडिओ व्हायरल
बाबाराजे जगताप यांचे नाव यापूर्वीही वादग्रस्त घडामोडींमध्ये आले होते. कुर्डू प्रकरणात त्यांनीच महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवरून जोडून दिले होते. त्या वेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांशी धमकीच्या स्वरूपात केलेल्या संभाषणामुळे ते अडचणीत आले होते.जगताप यांच्या विरोधात अवैध मुरूम उपसा, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना धमकावणे अशा प्रकारचे गुन्हेही दाखल झाले आहेत. आता त्यांचा नशा करतानाचा व्हिडिओ उघड झाल्याने त्यांच्यावर पुन्हा राजकीय आणि कायदेशीर दबाव वाढला आहे.
दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हातात फोन दिला अन् संवाद सुरू झाला. त्यानंतर अजित पवार आणि महिला अधिकारी यांच्यातील संवाद आणि व्हिडीओ कॉल व्हायरल झाला, त्यानंतर अजित पवारांवरती देखील टीका होत होती.
नेमकं प्रकरण काय?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.
कोण आहेत बाबाराजे? ज्यांनी अजितदाद आणि IPS कृष्णा यांच्या संवाद घडवला
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील वादग्रस्त संभाषण प्रकरण सध्या गाजत आहे. या संभाषणात अजित पवार यांनी वापरलेल्या भाषेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र हा संवाद नेमका घडवून आणला कोणाने? तर, या प्रकरणात माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष **बाबाराजे जगताप** यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.३१ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील कुर्दू गावात अवैध खननाच्या तक्रारींमुळे पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळीच बाबाराजे जगताप यांनी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांच्याशी फोनवर जोडले. याच संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला. दाखल झालेल्या एफआयआरमध्ये बाबाराजे यांचे नावही वरच्या क्रमांकावर आहे.
बाबाराजे जगताप यांनी मात्र आपली बाजू मांडताना सांगितले की हे काम ग्रामपंचायतीमार्फत कायदेशीररीत्या सुरू होते. “खोटी माहिती देऊन या कामाला अवैध ठरवले गेले. त्यामुळेच मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमचे नेते अजित पवार यांना संपर्क केला. त्यांनी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती स्पष्ट केली,” असे त्यांनी म्हटले.व्हिडिओबाबत बाबाराजे जगताप यांनी आरोप केला की तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी नव्हे, तर महिला अधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने किंवा ड्रायव्हरने शूट करून व्हायरल केला आहे. “या व्हिडिओचा उद्देश अजित पवार यांना बदनाम करणे हा आहे,” असा दावा त्यांनी केला.