Solapur : दुसऱ्या महायुद्धावेळी चीनमध्ये अतुलनीय वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. कोटणीस यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी चीनच्या राजदूतांनी आज सोलापुरात डॉ. कोटणीस स्मारकास भेट दिली. दुसऱ्या महायुद्धावेळी जपानने चीनवर आक्रमण केलं असताना चीनला मोठ्या वैद्यकीय मदतेची गरज पडली. त्यावेळी भारतातून रुग्णसेवेसाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकात सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा सहभाग होता. त्यांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. चार वर्ष चीनमध्ये वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉ. कोटणीस यांनी आपला अखेरचा श्वास देखील चीन मध्येच घेतला. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी आज कोटणीस स्मारकला भेट दिली. 


यावेळी सन वेईडिंग यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याला उजाळा दिला. 'डॉ. कोटणीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. चीन ते कधीही विसरणार नाहीत. त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगतानाच उज्वल भविष्यासाठी भारत - चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील' अशी ग्वाही चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी यावेळी दिली..


यावेळी चीनचे राजदूत सन वेइडोंग हस्ते चीनमधील क्रांतिकारक नेते माओ त्से तुंग यांच्या अक्षरातील शोकसंदेशाचे पत्र सुरक्षित पेटीत ठेवण्यात आले. चिनी सैनिकांचा इलाज करत असताना वयाच्या 32 व्या वर्षी डॉ. कोटणीस यांचे चीनमध्ये निधन झाले. त्यांच्या सोलापुरातील कुटुंबीयांना त्यावेळी माओ त्से तुंग यांनी चिनी भाषेत शोकसंदेश पाठवला होता.


29 डिसेंबर 1942 ला स्व: हस्ताक्षरात माओ त्से तुंग यांनी तीन फुटी कागदावर हे पत्र लिहले होते. हे पत्र खूप जीर्ण झाल्याने 2017  मध्ये दोन चिनी तज्ज्ञांनी सोलापुरात राहून त्या पत्राचा संरक्षित केलं. तसेच ते पत्र कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी चीन सरकारने खास काचेची पेटी महापालिकेला तयार करून दिली होती. मात्र म हापालिकेकडून तिची चावी हरवली. ती नव्याने करून घेण्यात आली आहे. त्यात शोकसंदेशाचे पत्र ठेवण्यात आले.


इतर महत्वाची बातमी: 


NCRB 2021 : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन का घेऊ नये? गणपतीने चंद्राला काय शाप दिला? जाणून घ्या काय आहे कथा...