NCRB 2021 : देशात (India) दिवसेंदिवस अत्याचाराच्या ( Rape Cases ) घटनांमध्ये वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने अलीकडेच त्यांचा अहवाल सादर केला आहे. त्यांच्या अहवालानुसार 2021 मध्ये 2020 पेक्षा अत्याचाराच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2021 मध्ये राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये (Maharashtra Third Number of Rape Cases) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2021 मध्ये देशात नोंदवलेल्या एकूण 31,677 बलात्काराच्या ( Rape Cases )  गुन्ह्यांपैकी 6337 राजस्थानमध्ये, तर 2845 बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आल्या आहे. 2020 मध्ये राजस्थानमध्ये बलात्काराच्या 5310 नोंदवल्या गेल्या होत्या. 2021 मध्ये त्यात 19.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
2021 मध्ये देशभरात महिलांविरोधातील 4,28,278 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 56,083 गुन्हे नोंद झाले आहेत, तर राजस्थानमध्ये 40,738 गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या वर्षी महिलांवरील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 39,526 गुन्ह्यांसह तिसऱ्या तर पश्चिम बंगाल 35,844 गुन्ह्यांसह चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात दिली आहे.  


राजस्थानमध्ये 2021 या वर्षात बलात्काराच्या 6337 प्रकरणांपैकी 4885 प्रकरणांमध्ये प्रौढ पीडितांचा समावेश आहे. तर 1452 प्रकरणे अल्पवयीन पीडिसांसोबत घडली आहेत. 2021 मध्ये एकूण 1,49,404 मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये 16.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिलांवरील गुन्ह्यांची बहुतांश प्रकरणे पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून छळ केल्याप्रकरणी नोंदवली गेली आहेत. त्याखालोखाल अपहरण आणि बलात्कारची प्रकरणे नोंद झाली आहेत. 


दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनीही महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर हा गुन्हेगारी वाढण्यामागील एक घटक मानला गेला आहे.  


महत्वाच्या बातम्या


NCRB 2021 : भारतात दररोज 450 लोकांच्या आत्महत्या, महाराष्ट्र देशात अव्वल